शेवगाव/प्रतिनिधी :-शेवगाव पोलिसांनी अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या एकाला जेरबंद केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपीकडून त्याच्याकडून चोरीच्या दुचाकीही हस्तगत केल्या आहेत.

नामदेव भागवत वटाने (वय 32, मुळगाव सावळेश्वर राक्षसभुवन ता. गेवराई, हल्ली राहणार कुरुडगाव ता. शेवगाव) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.दरम्यान शेवगाव पोलीस पथकाने खानापूर, रावतळे, कुरुडगाव येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई केली होती.


याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी (दि. 2) रात्री 11 च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व पोलीस कर्मचार्‍यांनी खानापूर, रावतळे-कुरुडगाव रस्त्यावरील हॉटेल शिवार येथे छापा टाकला. तेथील नामदेव भागवत वटाने यास गावठी कट्टा व चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी तीन वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी हस्तगत केल्या. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बुधवारी (दि. 3) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास शनिवार दि.6 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here