श्रीरामपुर/प्रतिनिधी :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने श्रीरामपूर येथील कार्यालयात बत्तिसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे परिवहन अधिकारी आशपाक खान पोलीस निरीक्षक संजय सानप,मोटार वाहन निरिक्षक. संदीप निमसे, नीलेश डहाके,व ईतर अधिकारी कर्मचारी. उपस्थित होते

कार्यक्रमाप्रसंगी वाहतुकीचे नियम सर्व नागरिकांसाठी का आवश्यक आहेत यावर मंचावर उपस्थित अधिकाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना पटवून दिले हेल्मेट घालने अथवा सीट बेल्ट लावणे याचा देखावा न करता या सवयी प्रत्येकाने अंगीकृत कराव्यात तसेच वाहतुकीचे नियम हे नागरिकांसाठी असल्याचे प्रतिपादन उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याची देखील टाळावे असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले कार्यक्रम आटोपल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली यावेळी उपप्रादेशिक कार्यालय श्रीरामपूर यांच्यासह जिल्ह्यातील विविध आरटीओ कार्यालयातील तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी तथा कर्मचारी देखील उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here