राहुरी/प्रतिनिधी :- राहुरी तालुक्यतील डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल मधील विद्यर्थिनी व मूळची राहता तालुक्यतील साकुरी येथील रहिवासी असलेली कु साक्षी ज्ञानेश्वर बनसोडे या वियर्थिनीने चालू वर्षी (सन 19-20) इ 10 वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केल्या प्रीतेर्थ कु. साक्षी ज्ञानेश्वर बनसोडे या विद्यर्थिनींचा श्रीगोंदा येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करून रयत शिक्षण सौंस्थेचे मॅनेजिंग कौंशील सदस्य व माजी मंत्री बबन दादा पाचपुते यांच्या हस्ते व विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत साक्षी ज्ञानेश्वर बनसोडे हिचा ट्रॉफी, सन्मान पत्र व रोख रक्कम देऊन नुकताच भव्य दिव्य असा सत्कार रयत सेवकांच्या उपस्थित करण्यात आला

सालाबादप्रमाणे दि रयत सेवक को ऑप बँक सातारा या रयत शिक्षण संस्थेच्या नामांकित बँके मार्फत रयत सेवकांच्या मुलांचा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य संपादन केल्याबदल विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळावी, हा प्रमुख उद्देश रयत सेवक को ऑप बँकेचा या कार्यक्रमा मागे असतो, आणि ती पारंपरिक धुरा प्रामाणिक पणे रयत बँक पार पाडत आहे.

साक्षी ज्ञानेश्वर बनसोडे या मुलीने आज पर्यंत शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमात सतत सहभाग नोंदवून आपल्या विद्यालयाचे व साकुरी (राहता तालुका)गावाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्या पर्यंत उंचावले आहे,ही मुलगी रयत शिक्षण सौंस्थेचे शारदा विद्या मंदिर, राहता येथील जेष्ठ शिक्षक व दलित मित्र पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर बनसोडे यांची सुकन्या आहे, ज्ञानेश्वर बनसोडे यांना देखील त्यांच्या सामाजिक ,शैक्षणिक, क्षेत्रातील विशेष कामगिरी बदल अनेकदा गौरविण्यात आले आहे. या ठिकाणी “बाप सवाई बेटी “असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

साक्षी बनसोडे या मुलीच्या या नावीन्य पूर्ण कामगिरी बदल संपुर्ण परिसरातून तिचे कौतुक करण्यात येत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भावी वाटचाचालिस शुभेच्या मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here