राहाता/प्रतिनिधी :- तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात राहणारा आरोपी जालिंदर तुळशीराम वांगे, वय ३३ वर्ष याला इयत्ता ५ वी तील १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका इ. ५ वीमध्ये  शिकणाऱ्या १० वर्षाच्या लहान मुलीवर २४ जानेवारी रोजी सायं. ४ च्या सुमारास आरोपी जालिंदर  तुळशीराम वांगे याने सदर मुलगी लहान अज्ञात अल्पवयीन आहे हे माहित असतानाही तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेवून तिला त्याच्या घरात नेवून तिच्यावर आरोपी जालिंदर तुळशीराम वांगे याने बळजबरीने बलात्कार केला.

तोंड दाबून विनयभंग केला. पिडीत विद्यार्थिनीने काल लोणी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी जालिंदर तुळशीराम वांगे याच्याविरुद्ध लोणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी डिवायएसपी संजय सातव, सपोनि समाधान पाटील यांनी भेट दिली. आरोपी जालिंदर वांगे याला पकडण्यात आले असून पोसई सुर्यवंशी हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने ३३ वर्षाचा नराधम उघड झाला आणि त्याला अटकही झाली. पालक वर्गात या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here