श्रीरामपुर : – शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या विशेष पथकाने तालुक्यातील श्रीरामपुर शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या तीन जणांविरोधात कारवाई करीत २४ हजार ५१८ रुपयांच्या गुटख्यासह पकडला असून ही कारवाई १ फेब्रुवारी रोजी केली आहे. या प्रकरणी ३ आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे
तालुक्यातील श्रीरामपुर शहरातील वेगवेगळ्या भागांतुन अवैध गुटखा विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे श्रीरामपुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप , पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील, व त्यांच्या पथकाने १ फेब्रुवारी रोजी छापा टाकला. या छाप्यात कांदा मार्केट, गुरुनानक नगर, वार्ड नं २ याठिकाना वरून २४ हजार ५१८ गुटखा जप्त केला. याप्रकरणी गणेश पालकर, अनिल लोगाणी, रफिक पिजारी यांच्या विरोधात श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.