ग्रामस्थांच्या मागणीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल

श्रीरामपूर/प्रतिनिधीश्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव ग्रामपंचायतने स्मार्टग्राम स्पर्धेत सहभाग घेतला परंतु मुठेवाडगाव ग्रामपंचायला ८४ तर स्पर्धतील दुसया ग्रामपंचायतला ८६ गुण दिल्यामुळे या गुणांकन अहवालावर संशय घेत मुठेवडगाव ग्रामपंचायतने स्मार्ट ग्रामयोजनेचे अध्यक्ष जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे हरकत घेत फेर मुल्यांकनाची मागणी केल्याने आज मुठेवाडगांवची जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांचे जिल्हास्तरीय समितीने फेर मुल्यांकन पाहणी केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या लेखी हरकत पत्रात म्हटले होते की पहिल्या स्वयं मुल्यांकना मध्ये ९७ गुण मिळाललेले असताना दुसऱ्या २९ आक्टोबर २०२० रोजीच्या राहता गटविकास अधिकारी ग्रामविकास विभाग तालुका स्तरीय स्मार्टग्राम समितीने आमच्या ग्रामपंचायतला ८४ तर स्पर्धेतील दुसऱ्या जाफराबाद ग्रामपंचायतला ८६ गुण दिले. या निर्णय अहवालावर आम्ही मुठेवाडगांव ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक सर्व माजी सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामस्थ या अहवालाचा हरकत घेत असून ही हरकत दाखल करुन घेत आपण आपल्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त करून फेर मुल्यांकन अहवाल तयार करण्याची मागणी केली होती.या मागणीवरुन आज जिल्हा परिषद प्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी निशीलकुमार ओसवाल यांनी मुठेवाडगांव येथे येऊन सहकारी विस्तार अधिकारी डी जी ठाकरे, अभंग, चर्हाटे श्रीरामपूर गट विकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी गावातील स्वच्छतायोजन, पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजनेसह डिजिटल शाळा संगणकीकृत कामकाज यासह आदी उपक्रमाची बारकाईने पाहणी केली.

ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हास्तरीय समितीचे प्रमुख निखिल कुमार ओसवाल यांच्यासह सर्वांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तर ग्राम विकास अधिकारी सुधीर उंडे यांनी आभार मानले याप्रसंगी माजी सरपंच भाऊसाहेब मुठे, सुभाष मुठे,अण्णासाहेब मुठे,पोलीस पाटील दत्तात्रय मुठे नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सरपंच कमिटीचे प्रमुख सागर मुठे,गोरख जाधव,शिवाजी पवार,नितीन बोरुडे,प्रकाश मुठे,रेवन दिघे,गणेश नेहे,कैलास पाचपिंड,बाबासाहेब भोंडगे,आदिनाथ दिघे,संजय मुठे यासह आदी उपस्थित होते.

चौकट- राजकीय हस्तक्षेप संशयावरून ग्रामस्थांनी केली होती फेरमूल्यांकनाची मागणी
मुठेवाडगाव ग्रामपंचायतीने मागील वर्षातही स्मार्ट ग्राम योजनेत सहभाग घेतला असताना राजकीय हस्तक्षेप होऊन नंबर गेला यावर्षी राहता पंचायत समिती गट विकास अधिकारी समितीने केलेल्या मूल्यांकनात दोन गुण कमी मिळाले माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदार संघातील अधिकाऱ्यांनी विखे पाटील यांचे खंदे समर्थक संदीप शेलार यांच्या जाफराबाद ग्रामपंचायतीस झुकते माप दिल्याचा संशय घेत राजकीय हस्तक्षेपामुळे मुठेवाडगाव करांवर तीच वेळ आल्याने गावातील सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन फेरमूल्यांकन समितीची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here