श्रीरामपुर/प्रतिनिधी :- संपूर्ण देशामध्ये पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस याचे प्रचंड भाव मोदी सरकारने वाढवले आहे त्याविरोधात आज शिवसेनेने तीव्र आंदोलन करून तहसीलदार साहेब यांना ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी आंदोलन करून निवेदन दिले त्यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी असे सांगितले की मोदी सरकारला एकदा नव्हे तर दोन वेळेस जनतेने पूर्ण बहुमत दिले पण मोदी सरकार या बहुमताचा गैरवापर करत आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत आज सर्वात कमी असताना सुद्धा पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे प्रचंड भाव सरकारने वाढवून ठेवले आहे त्यामुळे सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत मागील वर्षी कोरोना मुळेअनेक नागरिकांचे रोजगार गेले तसे अनेकांचे व्यवसाय मोडकळीस आलेले आहेत अनेकांचे बुडाले आहेत तरूणांच्या हाताला रोजगार नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अशा वेळेस या इंधन दरवाढीने सामान्य लोकांचे अजून प्रचंड हाल होत आहे. त्याचप्रमाणे या इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना ही मोठ्या प्रमाणात बसत आहे

शेतकऱ्यांच्या मालाला मालाला भाव नाही असे असताना इंधनाचे दर वाढवून शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे .तिकडे शेतमालाला भाव नाही तर दुसरीकडे ट्रॅक्टर साठी लागणारे डिझेल चे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतीची मशागत करणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही परिणामी शेती धंदा मोडकळीस येणार आहे तसेच तयार झालेला पिकाला दुसऱ्या शहरांमध्ये पाठवायला इंधन दरवाढीमुळे खूप महाग पडत आहे पण मालाला भाव नाही अशा दुहेरी संकटात शेतकरी आज सापडलेला आहे .त्यामुळे मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी आज सर्व शिवसैनिकांनी हे आंदोलन केले आहे असे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी यावेळी सांगितले. तर केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घेतली नाही तर यावरून एक तीव्र आंदोलन पुढील वेळेस करण्यात येईल असेही या वेळेस नमूद करण्यात आले.

यावेळी मोदी सरकारचा निषेध करून श्रीरामपुर तहसील दार प्रशांत जी पाटील यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाऊसाहेब जी कांबळे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे, जिल्हा संघटक डॉक्टर महेश शिरसागर,तालुका प्रमुख दादा कोकणे, बेलापुर शहर प्रमुख लखन भगत ,युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार ,ज्येष्ठ शिवसैनिक यासीन भाई सय्यद, ,रामा शेठ अग्रवाल मदनलाल बत्रा, सुभाष जी जंगले, सागर हरके ,रमेश घुले ,किशोर फाजगे, अरुण पाटील अशोक थोरे ,संदीप जगधने ,बाळासाहेब गायकवाड ,विष्णू मोढे, सुरेश बारस्कर, सागर हरके, रोहित भोसले, निलेश पाटणी, किशोर नाईक,कैलास पुजारी कैलास भणगे, शुभम ताके, शुभम आढाव,सतु महाराज गौड, प्रदीप वाघ, सुधा तावडे, यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here