आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांचा एल्गार

श्रीरामपुर/प्रतिनिधी :- दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी विज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या टाळे ठोको आंदोलनाल करण्यात आले भाजपा उत्तर अ.नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे शहर व तालुक्‍याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील ७२ लाख वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महाभकास आघाडीने घेतला त्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आल्या *““महाभकास बिघाडी सरकारचा धिक्कार असो'” तसेच महावितरण कार्यालय साळुंके बिल्डिंग, डॉ. हेगडेवार चौक येथील विजवितरण कार्यालयला भाजपा श्रीरामपूर शहर व तालुक्‍याच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी ताळे ठोकले व “’कोरोनाकाळातील वीज बिल माफ करा नाही तर खुर्च्या खाली करा” अशी घोषणा करण्यात आली. ‘कोरोनाकाळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन या बिघाडी सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पुर्तता न करता उलट हे बिघाडी सरकार वीज बीलावर व्याज लावून वसूली चालू आहे व जनेतला त्रास देत आहे. तसेच थकित बील नाही भरले तर वीज कर्मचारी वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी जनतेला देत आहे. श्रीरामपूर शहरातील असंख्य गोरगरिब जनतेचा विज पुरवठा खंडीत केला यावरून हे सरकार किती निर्दयी व असंवेदनशील आहे असे दिसून येते. खरे तर या तीघाडी सरकारचा एकमेकांमध्ये कोणताही ताळमेळ नाही म्हणुन तीघाडी बिघाडी सरकारचा मनमानी कारभार जनतेसमोरबउघड होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता या तिघाडी बिघाडी सरकारला माफ करणार नाही.

मागील भाजपा सरकारच्या काळात कधीच शेतकऱ्यांना विज बील भरण्यात सक्ती केली गेली नाही. व भारनियमाचा देखील कोणताही त्रास जनतेला झाला नाही. विज ग्राहकांना दिलासा देण्याची भुमिका घेतली. थकबाकी वाढली तरी तो आर्थिक भार त्यावेळी राज्यसरकारने स्वत: वर घेतला असूनही त्यावेळी वीज कंपनीची परिस्थिती देखील चांगलीच होती. पण बिघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर वीज कंपनीची आर्थिक परिस्थिती बिघडली कशी? अशा सवाल खरेतर उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे सध्याचे तीघाडी महाभकास सरकारने कोरोना काळात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संपूर्ण वीज बील माफ
करण्याची घोषणा तात्काळ करावी. अन्यथा यानंतर कोणतीही पूर्व सुचना न देता राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी या तिघाडी सरकारची राहील.

यावेळी जि. उपाध्यक्ष सतिश सौदागर, तालुका अध्यक्ष बबन मुठे, शहरअध्यक्ष मारूती बिंगले, भ. विमुक्त सेल जिल्हाध्यक्ष विठठल राऊत आदिंनी आपल्या तीव्र स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केला. या आंदोलनाला भाजपा जिल्हा सांस्कृतिक सेल बंडुकुमार शिंदे, विशाल यादव, डॉ. ललित सावज, मिलिंद कुमार साळवे, रूपेश हरकल, प्रफुल्ल डावरे, पुरूषोत्तम भराटे, राकेश कुंभकर्ण, किशोर खरोटे, अशोक मुंडलिक , रामभाऊ तरस, महेश खरात, संतोष हरगुडे, अण्णासाहेब खरात, सुनिल डिवटे, दत्त जाधव, अक्षय नागरे, विशाल अंभोरे, विजय लांडे, चंद्रकांत परदेशी, सुहात पंडीत, सोमनाथ परदेशी, किरण वरटे, दिनेश दळवी, जालिंदर निकाळजे, कैलास येवले, देवा चावरीया, अमोल मोरे, सुरेश चांदणे, रवि पंडीत, अमोल अबिंलवादे, वैभव डवळे, विशाल जाधव, भाऊसाहेब कणगरे, अजित बाबेल, आनंद बुधेकर, अक्षय वर्षे, योगेश ओझा, विनोद वाघमारे, संदिप अडांगळे, गणेश कुऱ्हे, रोहित मिसाळ, संदिप रणनवरे, मच्छिंद्र हिंगमिरे, किशोर खडवंडे, कैलास हेबळे, आकाश बिंगले, यशराज शिंदे आदि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here