माळवाडगाव/प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी माळवाडगाव सेवा सोसायटीवर माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले गिरीधर आसने पा यांनी बिनविरोध सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.

तालुक्यातील माळवाडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पवार हे काम पाहत असून या निवडणुकीत संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते,आज दि.५ रोजी श्रीरामपूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली त्यामध्ये सर्वच १२ अर्ज मंजुर करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी बाराच अर्ज शिल्लक राहिल्याने सर्वसाधारण गटाच्या आठ जागांवर गिरीधर किसनराव आसने पा,अॅड उमेश दत्तात्रय लटमाळे,निवृत्ती कारभारी आसने,बाबासाहेब सयाजी आसने,भास्करराव रायभान आसने,सुरेश भाऊसाहेब चिडे,अमोल भारत मोरे,सौ अर्चना अशोक आसने, यांची, तर इतर मागास वर्गाच्या एका जागेवर राजेंद्र बाबासाहेब आढाव, महिला राखीव गटाच्या दोन जागांवर सौ किसनाबाई नानासाहेब आसने व लताबाई दिलीप आसने तर भटक्या जाती जमातीच्या एकाजागेवर नानासाहेब विष्णू शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सचिव रमेश जाधव यांनी निवडणूक कामात सहकार्य केले.

या निवडणूक प्रक्रियेत सभासदांचा सत्ताधारी असलेले गिरीधर आसने पा यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास दिसून आला ही निवड प्रक्रिया अतिशय शांततेच्या मार्गाने पार पडली असून या निवडीनंतर माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील,माजी आमदार भानुदास मुरकुटे,खा डॉ सुजय विखे पाटील,जि प माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,माजी सभापती दीपक पटारे,जि प सदस्य शरदराव नवले,संगिता गांगुर्डे,अविनाश कुलकर्णी,सभापती सौ.संगिता शिंदे,उपसभापती बाळासाहेब तोरणे,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे,सौ मंजुश्रीताई मुरकुटे,पं.स.सदस्य कल्यानी कानडे,वैशाली मोरे,सुनिल शिंदे,अॅड अजित काळे, भाऊसाहेब बांद्रे,गणेशराव मुदगुले,माळवाडगावचे लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे,माजी पो.पा.श्रीधर आसने,माजी संचालक सारंगधर आसने,तंटामुक्ती अध्यक्ष सुदामराव आसने,नानासाहेब आसने,किसनराव आसने,दिलीपराव हुरुळे,साहेबराव आसने,शरद आसने,पत्रकार विठ्ठलराव आसने,भाऊसाहेब काळे,रावसाहेब काळे,सुभाष आसने, गोरख आसने,बाबासाहेब आसने,गोकुळ त्रिभुवन,बाळासाहेब मारुती आसने,शंकरराव ना आसने,मा.व्हा.चेअरमन गोरख दळे,मच्छिंद्र दळे,जगन्नाथ आसने,शंकर लटमाळे,बाबासाहेब लटमाळे,लक्ष्मण आसने,गजानन आसने,वसंतराव पिंपळे,बापुसाहेब चव्हाण,भाऊसाहेब ग आसने,सुभाष मोरे,उत्तमराव आसने जालिंदर आसने,बाळासाहेब ठकाजी आसने,प्रदिप आसने,बाबासाहेब आढाव,रावसाहेब आढाव,प्रशांत आढाव,रमेश आसने,रमेश बारहाते,दादासाहेब अनुसे,भास्कर शिंदे,भाऊसाहेब आसने,साहेबराव कर्पे,जालिंदर कर्पे,राजेंद्र कर्पे,विश्वास वाघमारे,पत्रकार संदिप आसने यासह आदींनी अभिनंदन केले.

सदर संस्थेची स्थापना कै.किसनराव आसने (तात्या) यांनी १९४७ साली केली असून आजपर्यंत हि संस्था त्यांच्याच गटाकडे अबाधित आहे.कै.किसनराव आसने यांच्या सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत गिरीधर आसने पा (तात्या) या संस्थेचा कारभार पहात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here