श्रीरामपूर(वार्ताहर)- शहरात प्रत्येक प्रभागात विकास कामाना प्रारंभ झाला आहे. शहरातील सर्व रस्त्याचे कामाना सुरवात झाली आहे. प्रभाग १३ व १४ मधील विकास कामे यापुर्वी झाली होती. आज पुन्हा या भागात विविध विकास कामाना प्रारंभ झाला असल्याचे असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.

नगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक १३ व १४ मध्ये रस्ते खडीकरण व डांबीरकरण कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या शुभहस्ते झाला . यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी प्रभागातील नगरसेविका वैशालीताई चव्हाण, नगरसेवक दिपक बाळासाहेब चव्हाण,संतोष कांबळे, प्रकाश ढोकणे, अलतमश पटेल, योगेश जाधव,सागर कुèहाडे, पंकज विळस्कर, उदय सांबळे, प्रशात आमले, अक्षय नांगरे,रोहित साबळे, नवनाथ पवार, अमोल शिराळ, किरण ऊईके, निलेश कुसळकर, सुनिल साळुंके, नारायण राणे, रेणुका राणे, यमुणा राणे,बोरसे , नयन गांधी, नगर अभियांता राम सरगर,अभियांता गौरव यादव यांच्यासह प्रभागातील नागरिकानी मोठ्यासंख्याने उपस्थित होते.यावेळी त्या म्हणाल्या की,शहरवासियांनी जो विश्वास माझ्यावर दाखविला आहे त्या विश्वासाला मी पात्र राहून काम करत आहे.शहरातील विविध विकास कामांना निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे साहेब,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपरे,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाशदादा आदिक यांचे मला मोलाचे सहकार्य लाभत आहे.त्यामुळेच शहरातील सर्वच भागात विकास कामे सुरु आहेत.राज्यात श्रीरामपूर शहर विकासकामांत अग्रेसर आहे.सुरु असलेल्या कामांमध्ये गुणवत्तेत काही तडजोड चालणार नाही,असा सज्जड इशारा त्यांनी ठेकेदारांना यावेळी दिला.याप्रसंगी बोलतांना नगरसेवक दिपक चव्हाण म्हणाले,गेल्या २० ते २५ वर्षांपासून भागातील रस्त्यांची मागणी नागरिक करत होते.यासाठी अनुराधाताई आदिक यांचेकडे आंम्ही सतत पाठपुराव करत आलो त्यांनी या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल मी नागरिकांचे वतीने त्यांचे आभार मानतो.राहिलेल्या कामांसाठी ही ताईंनी निधी मंजूर करावा ज्यामुळे भागातिल प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल.यावेळी बोलतांना नगरसेवक संतोष कांबळे म्हणाले की,या प्रभागात माझ्या सहकारी नगरसेविका वैशालीताई चव्हाण यांच्या सहकार्याने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.
यावेळी वाबळे ते भागवत यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे , पांडे यांच्या घरापासुन विळस्कर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे,उदय भोजनालय पासुन सोमनाथ कुèहाडे यांच्या घरापर्यंत गटार बांधकाम करणे या विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रास्तविक नगरसेवक दिपक बाळासाहेब चव्हाण यांनी केले तर आभार नगरसेवक संतोष कांबळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here