श्रीरामपुर/प्रतिनिधी : अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवरती राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. परंतु या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएस हिंदू वादी संघटना हे देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. अशा परिस्थितीत देवळाली प्रवरा याठिकाणी कॉग्रेसच्या मेळाव्यात श्रीरामपुरचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी यांनी आक्षेपार्ह विधान केले त्यामध्ये ते बोलले की प्रभु श्रीराम मंदिर निर्माणनिधी संकलन करणाऱ्या रामभक्तांना खंडणीखोर आहे वर्गणी द्या नाहीतर तुम्ही देशद्रोही आहात, राम राम करण्याऐवजी जय श्रीराम असे म्हणा वर्गणीच्या नावाखाली खंडणी गोळा करत आहे अशा आशयाचे माहिती एका दैनिक वृत्तपत्रातून झलकण्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध म्हणुन आज संध्याकाळी श्रीराम मंदिर चौकात सर्वं हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आला

त्यानंतर श्रीरामपूरातील विविध हिंदुत्ववादी संघटना व रामभक्तांनी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना या लोकप्रतिनिधी विरोधात आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली सर्व परिस्थिती पाहता श्रीरामपुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास श्रीरामपुर पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत

श्रीराम मंदिर चौकात सर्वं हिंदुत्ववादी संघटनेने आपल्या भावना तीव्र शब्दांत निषेध नोंदवला यावेळी मोठया संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते