माळवाडगाव/प्रतिनिधी :- एकीकडे देशात कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना धरा ते वीस वर्षापासून शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करणार्‍या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रकार समोर आलाय अहमदनगर जिल्ह्यातील माळवाडगाव तालुका श्रीरामपूर येथे वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील तीन भुसार व्यापाऱ्यांनी आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालून कुटुंबासह पसार झाल्याचे काल सकाळी उघडकीस आले शेतकऱ्यांनी याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे आमदार लहू कानडे यांच्याकडे तक्रार केली रमेश,गणेश व चंदन मुथा अशी या व्यापाऱ्यांची नावे असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे याबाबत मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यापारी सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून माळवाडगाव येथे वास्तव्यास आहे त्यांचा एक भाऊ शेजारील खानापूर येथे राहत होता अशाच पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून तो दोन वर्षापूर्वी पसार झाला होता मात्र रमेश मुथा आणि गणेश मुथ्था हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह माळवाडगाव येथे राहत होते किराणा दुकान आणि भुसार व्यापाराच्या माध्यमातून ्यांनी शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला होता काही दिवसापूर्वी त्यांचा एक मुलगा भूषण हा देखील पळून गेला होता.आता रमेश आणि गणेश यांच्यासह दुसरा मुलगा चंदन व्यापार पाहत होतमाळवाडगाव मुठेवाडगाव खोकर भोकर खानापूर वडाळा महादेव कारेगाव मातापूर उंदिरगाव भामाठाण परिसरातील शेतकऱ्यांकडून ते भुसार मालाची खरेदी करत असायचे शेतकरी त्यांच्याकडून गरजे नुसार पैसे घेत अनेकांना जास्त भावाचे आमिष दाखवून पैसे ठेवून घेतले होते काल पर्यंत त्यांनी व्यापार सुरळीत सुरू ठेवला होता मात्र रात्रीतून घरदार वाहने सोडून ये पसार झाले घराचे दरवाजे सताड उघडे होते काल सकाळी सहाच्या सुमारास शेजारील ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर गावात चर्चा झाली आणि मुथ्था कुटुंबीय पसार झाल्याची माहिती माळवाडगाव सह परिसरात वार्‍यासारखी पसरली शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांचा मुथ्था कुटुंबावर महाराष्ट्र बँकेचे सुमारे दोन कोटींचे कर्ज आहे त्यामुळे बँकेने आज त्यांच्या घराला कुलूप लावले पुढील कारवाई संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले दरम्यान श्रीरामपूर शहरातील एका प्रथितयश पतसंस्थेची ही लाखो रुपयांचे कर्ज मुक्ता कुटुंबीयांनी थकलेले आहे काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाचे पैसे घेऊन व्यापारी पसार झाल्याने शेतकरी संतप्त झाले सुमारे शंभरावर शेतकऱ्यांनी तालुका पोलीस ठाणे आणि आमदार लहू कानडे यांच्याकडे आपली कैफियत मांडली मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here