श्रीरामपूर(वार्ताहर)- येथील सतत सामाजिक, धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रात तळमळीने काम करणारे विजय नगरकर यांना इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्था व साप्ताहिक वसुंधरा वार्ताच्यावतीने महाराष्ट्र लोकरत्न वसुंधरा गौरव पुरस्कार समाज भुषण या पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे पत्र संस्थेचे अध्यक्ष व संपादक विजय बचाराम तोडकरी यांनी दिले आहे. नगरकर यांनी याआधी विविध क्षेत्रामध्ये काम केलेले आहे.हा पुरस्कार रविवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी मान्यवरांच्या हस्ते कुरहिन शेट्टी भवन इचलकरंजी येथे प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी साप्ताहिक वसुंधरा शक्तीच्या वर्धापन विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. नगरकर यांना याआधी बरेच पुरस्कार मिळाले. त्यात २०१६ मध्ये लातुर येथे बसवसमितीच्यावतीने मान्यावरांच्या हस्ते समाजभुषण पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here