श्रीरामपुर/प्रतिनिधी (गौरव डेंगळे) :- तालुक्यातील उक्कलगाव या ठिकाणी प्रथमच प्रशासकीय बैठक व अमृततुल्य हितगुज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

भारतात जन्म घेणे म्हणजे हे महान पुण्य, महाराष्ट्र म्हणजे भारताचे हृदय, म्हणूनच या पुण्यवान भूमीत जन्म घेणे आपलं नशीब आहे. त्यामुळे आपण भाग्यवंतानी अध्यात्मिक मार्ग का करावा याचे विश्लेषण आपल्या अमृततुल्य हितगुज मधून प पु गुरुमाऊलींनी सर्वाशी संवाद साधत त्यांनी केले.श्रीरामपूर तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र उक्कलगाव या ठिकाणी प्रशासकीय बैठक व अमृततुल्य हितगुज या कार्यक्रमाचा निमित्ताने प पू गुरुमाऊली सर्वांना मार्गदर्शन करत होते. आपण सर्व सेवेकर्‍यांनी या महान कार्याचा प्रचार प्रसार गावागावात करून प्रत्येकाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे महत्त्व आणि आपल्याला आलेली प्रचिती सर्वांना अवगत करून द्यावी. हा मार्ग मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित व सुसंस्कारित पिढी घडवण्याचे कार्य करत आहे. केंद्राच्या माध्यमातून १८ पेक्षा जास्त विभाग कार्यरत असून, या विभागाच्या माध्यमातून देशात नव्हे तर परदेशात देखील स्वामी कार्य सुरू आहे. मानवाला मन शांती प्राप्त करायची असेल तर स्वामी मार्गच या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ मार्ग आहे असे प्रतिपादन या अमृततुल्य हितगुजामध्ये प पु गुरुमाऊलींनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुमाऊलींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, ज्येष्ठ नेते श्री इंद्रनाथ पाटील थोरात,श्री रावसाहेब थोरात, सरपंच श्री नितीन थोरात, दैनिक राष्ट्रसह्याद्रीचे संपादक श्री करण नवले तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बोरावके नगर व नांदूर यांच्या वतीने भारतीय अस्मितातेची उत्कृष्टरीत्या मांडणी करण्यात आली होती. कार्यक्रमापूर्वी बाल संस्कार विभागाअंतर्गत नृत्य व नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने तालुक्यातील सर्व ४० केंद्राचा आवाल गुरुमाऊलींचे चरणी सादर करण्यात आला.यावेळी तालुका तून सेवेकरी तसेच बहुसंख्येने श्रोते उपस्थित होते. तसेच श्रीरामपूर तालुका प्रशासकीय प्रतिनिधी श्री प्रताप सरोदे,श्री कारभारी कान्हे(नाना),श्री गिरमे आप्पा,श्री अरविंद थोरात, श्री आप्पा थोरात,श्री दिपक बोरसे,श्री सुनील औताडे,श्री जीतू नागवडे, श्री मंगेश पाटील, जिल्हा प्रतिनिधी श्री सुरेन्द्र खर्डे,श्री विजय कडू,श्री घोरपडे सर,श्री नितीन होन,श्री अभिजीत कुटे,श्री शुभम मोरे ,श्री निमसे मामा,श्री भारत कोळसे,श्री मचींद्र उंडे,श्री गणेश शेवंते,श्री रादु पवार,श्री साहेबराव हिंगे,श्री साळुंके आधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here