अहमदनगर/प्रतिनिधी :- २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या, अहमदनगर जिल्हा बँकेच्या २१ संचालिका करिताच्या निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे, या निवडणुक प्रक्रियेतील माघारीच्या अंतिम मुदतिच्या दिवशी, काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व तसेच राष्ट्रवादी ,शिवसेना व इतर मित्र पक्षाच्या नेत्यांनी, या निवडणुकीत ऐकीचे बळ दाखविल्याने, २१ पैकी श्रीरामपूर तालुक्याच्या वाटेला, सेवा सोसायटी मतदार संघातून लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे व ओबीसी मतदार संघातून, श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांची, बिनविरोध निवड झाल्याने, श्रीरामपूर नगरपरिषदे समोर ससाणे समर्थकांनी फटाकडे वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक श्रीनिवास बिहानी, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, माजी नगरसेवक आशिष धनवटे, जिल्हापरिषद सदस्य बाबासाहेब दिघे, सुनील ससाणे, महेंद्र ताटीया, दीपक कदम आदी उपस्थितीत होते

अ.नगर जिल्हा सहकारी बॕक निवडणूक बिनविरोध झालेले उमेदवार पुढील प्रमाणे सेवा सोसायटी मतदार संघ अकोले – सिताराम गायकर, जामखेड – अमोल राळेभात, कोपरगाव- विवेक कोल्हे, नेवासा – मंत्री शंकरराव गडाख, पाथर्डी- आमदार मोनिकाताई राजळे,
राहाता – अण्णासाहेब म्हस्के, राहुरी – अरुण तनपुरे, संगमनेर – माधवराव कानवडे, शेवगाव – चंद्रशेखर घुले, श्रीगोंदा – राहुल जगताप, श्रीरामपुर – भानुदास मुरकुटे.

अनुसुचीत जाती मतदार संघ अकोला- अमीत भांगरे,

इतर मागासवर्ग श्रीरामपूर- करण जयंत ससाणे

विमुक्त जाती भटक्या जमातीमधे- गणपतराव सांगळे

शेती पुरक प्रक्रीया कोपरगाव- आमदार अशुतोष काळे

महीला प्रतिनीधी मतदार संघ श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागवडे, कर्जत- आशा काकासाहेब तापकीर एकूण १७ उमेदवार बिनविरोध झाले

तर नगर पारनेर कर्जत आणि बिगर शेती मतदार संघ अशा ४ जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे यांमध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, मा. आ. वैभव पिचड, मा. आ. पांडुरंग अभंग या दिग्गजासह अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here