श्रीरामपुर/प्रतिनिधी :- शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील जनतेच्या कामासाठी निवडून दिलेले नगरसेवकाची ही भाषा असले तर पुन्हा मत मागायला आल्यावर काय होईल हे आता तुम्हीच ठरवा. श्रीरामपुर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील, नेहरू नगर परिसरात राहणा-या नागरिकांच्या घरात, गटारीचे पाणी जात असल्याने, येथील नागरिकांनी वारंवार भागातील नगरसेवक तसेच पालिकेच्या लोकांना सांगितले, मात्र कोणत्याही प्रकारची दाखल न घेतल्याने, त्रस्त झालेल्या नागरिकाने प्रभाग ३ मधील नगरसेवकास फोन करून, गटार साफ करणारे का नाही आले ते काय आम्ही मेल्यावर येणार का ?, असा सवाल करताच हज ला जाऊन आलेल्या नगरसेवकाने प्रभागातील नागरिकाशी अरेरावी करत चक्क गलिच्छ शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाल्याने प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलीय, नेमकी काय म्हणाले नगरसेवकला गलिच्छ शिवीगाळ झाल्याची क्लिप व्हायरल झाल्याने, आगामी निवडणुकीवर याचा नक्कीच परिणाम पाहायला मिळणार की, पुन्हा लोक अशा लोकांना निवडून देतील का हे आता येणारी वेळच ठरवेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here