श्रीरामपुर/प्रतिनिधी :- तालुक्यातील सृजनशील आमदार म्हणून ओळखल्या जाणारे, माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव पवारांना, दाटलेल्या अंतःकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. बुधवार १० फेब्रुवारीच्या दुपारी १ वाजेच्या सुमारास, माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव पवारांचे निधन झाल्याची वार्ता वा-यासारखी पसरली, त्यानंतर संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली, मोठ्या संख्येने नागरिकांनी साखर कामगार रुग्णालयात गर्दी केली मात्र पाणी प्रश्नासंदर्भातील अभ्यासू, तसेच राजकारणातील सैयमी नेतृत्व हरपल्याची पुष्टी झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली, आज पुणतगाव येथे, माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव पवारांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आला, त्यांच्या अंत्यदर्शनासाठी, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह, मोठा जनसमुदाय उपस्थित होता, आणि बघता बघता असंख्य चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणून, दौलतराव पवार अनंतात विलीन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here