श्रीरामपुर/प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या, वार्ड नंबर ७ डावखर मळा येथे राहत असलेल्या, मनजीत दद्देल यास भडगाव पाचोरा,जळगाव येथून कुंती लोकबहाद्दूर सुनार, लोकबहाद्दूर सुनार हे दोघे भेटण्यासाठी आले असता, ११ फेब्रुवारीच्या पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास अज्ञात ४ इसमांनी, लोखंडी रॉड व लाकडी दांड्याच्या साह्याने, मनजीत दद्देल यांच्या घरातील कडी तोडून प्रवेश केला व कुंती लोकबहाद्दूर सुनार, लोकबहाद्दूर सुनार या दोघांना बेदम मारहाण करून, त्यांच्या जवळील ११ हजार रोख रक्कम व ९ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र असा मुद्देमाला, दरोडेखोरांनी लंपास केला, डावखर मळा येथे झालेल्या सशस्त्र दरोडात, कुंती लोकबहाद्दूर सुनार ही महिला गंभीर जखमी झाल्याने तीस , साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दरोड्याच्या या घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच नगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली, डावखर मळा येथील सशस्त्र दरोडया प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात, भदवी कलम ४५२,३९४, ३४ अन्वये, ८१ / २०२१ गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असून, या दरोडा प्रकरणाचा पुढील तपास, सहायक पोलिस निरीक्षक समाधान सुरवाडे हे करीत आहे, शहरालगत असलेल्या अरविंद डावखर यांच्या मळ्यात दरोडा पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणी पोलिस कोणत्या दिशेने तपास करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here