शिर्डी/प्रतिनिधी :- शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत गेल्या पाच वर्षापासून नोकरी करत असलेल्या शिक्षिकेनी शिर्डी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत मुख्याध्यापक गंगाधर विश्वनाथ वरघुडे वय 52 वर्ष रा शिर्डी हा वेळोवेळी वाईट नजरेने बघणे,कामाच्या ओघात शरीराला स्पर्श करणे,कार्यालयात गेल्यावर वाईट हेतूने पकडणे अशी कृत्य करत होते.याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना देखील माहिती दिली होती मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढतच गेले. दि.६ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन वाजेच्या सुमारास ड्युटीवर असताना मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे यांने काम आहे असे सांगत कार्यालयात बोलावुन मोबाईल मधील अशील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली यावेळी शिक्षिकेने नकार दिला असता मुख्यधापक गंगाधर वरघुड़े याने जबरदस्ती केली. याबाबत सदर शिक्षिकेने मदतीसाठी ओळखीच्या शिक्षकेला विनंती केली असता त्यांनीदेखील सरांना असे करू नका असे सांगितले त्यावेळी त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगितला तर संपवून टाकीन माझ्या राजकीय ओळखी आहेत त्यामुळे कोणाला काही सांगू नका अशी सांगितले अशी तक्रार शिक्षिकेने शिर्डी पोलिसात दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ००६०भादवि ३५४अ,३५४ड,५०६अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here