पैठण दिनांक 11 : दिनांक 10 रोजी सामनामध्ये एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती या बातमीमध्ये घोटाळे चव्हाट्यावर येण्याचे वृत्त छापले होते व भाजपा गटनेते आबासाहेब बरकसे यांनी या प्रकरणात माहिती मागितल्याचे व भाजपमधील बेबनाव असल्याचे व अंतर्गत धुसफूस असल्याचे वृत्त छापून आले होते, मात्र याबाबत श्री बरकसे यांनी खुलासा करून सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकल्याचे दिसून आले आहे.
याबाबत बरकसे यांनी असे देखील म्हटले आहे कि सामना हा शिवसेनेचा मुखपत्र असून त्यांना वाटेल त्या पद्धतीने राजकीय व वैयक्तिक फायदा होईल या दृष्टिकोनातूना त्यांचे बातमीदार बातमी छापून आणतात. पत्र देण्याअगोदर मी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व नगराध्यक्ष सुरज लोळगे यांना पूर्व कल्पना देऊनच माहिती मागितली होती .पत्र दिले म्हणजे आमच्या बेबनाव आहे असे बिलकुल नाही. सामनाच्या लेखातून निव्वळ भांडणं लावायचा व व्यक्तिगत फायद्याचा उद्देश मला दिसतोय असं देखील आबासाहेब बरकसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चुकीची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या बातमीदाराला चांगलीच चपराक बसली आहे असे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here