श्रीरामपूर – भाजपा ओबीसी मोर्चाच्या उत्तर नगर जिल्हा युवा अध्यक्षपदी श्रीरामपूर येथील युवक कार्यकर्ते संदिप पवार यांची निवड केल्याची माहिती ओबीसी मोर्चाचे प्रदेश युवा संपर्क प्रमुख निरंजन डहाळे यांनी दिली. याप्रसंगी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते हे उपस्थित होते.

यासंबंधीचे नियुक्तीपत्र निरंजन डहाळे यांनी काल श्रीरामपूर येथे येवून संदिप पवार यांना दिले. याप्रसंगी बेलापूरचे नवनिर्वाचित सरपंच महेंद्र साळवे, व संदिप पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र ण, संजय पांडे, नगरसेवक किरण लुणिया, अभिजित कुलकर्णी, मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे, नेवासा भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, सोमनाथ कदम, गणेश भिसे, संजय यादव, संदिप वाघमारे, शिवाजी सुर्यवंशी, सल्लाऊद्दीन शेख, बाबासाहेब हिवराळे, आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश युवा संपर्क प्रमुख निरंजन डहाळे म्हणाले की, संदिप पवार यांना भाजपाच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात काम करण्याची मोठी संधी मिळाली असून भाजपाचा सर्वात मोठा जनाधार ओबीसी समाज असल्याने हा सर्व जनाधार पक्षाच्या पाठीशी उभा करण्याची मोठी संधी आहे. संदिप पवार यांनी युवकांमध्ये मोठे संघटन उभे करुन या संधीचे सोने करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात भाजपाने मोठ्या संघर्षातून दुस-या क्रमांकाचा जनाधार निर्माण केला. यामध्ये वाढ करुन भाजपाचा क्रमांक पहिला पक्ष बनविण्यासाठी अजूनही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. या संघर्षासाठी युवक कार्यकर्त्यांनी तयार व्हावे असे आवाहन केले.

याप्रसंगी बोलताना बेलापूरचे नवनिर्वाचित सरपंच महेंद्र साळवे म्हणाले की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच भाजपा पासून झालेली आहे. आजपर्यंत आम्ही सर्व प्रकाश अण्णा चित्ते यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी चळवळीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहोत. प्रकाश अण्णा चित्ते यांच्यामुळेच मला बेलापूरसारख्या मोठया गावचा सरपंच होण्याची संधी मिळाली असून भविष्यातही त्यांच्याच नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आम्ही सक्रीय राहू अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी अभिजित कुलकर्णी, नेवासा भाजपा मनोज पारखे, नगरसेवक किरण लुणिया व संदिप पवार यांचीही भाषणे झाली.

याप्रसंगी राजू पडवळकर, सुहास पवार, राजू मोरे, शादाब शेख, प्रतिक देशमुख, रवि विखे, रवि चव्हाण, राहुल काटे, उत्तम तरटे, निलेश इनामके, रवि गायकवाड, मोह्सीन शेख, अविनाश गायकवाड, पप्पू भोंगळे, मनोज भोंगळे, सुधीर काळोखे, सचिन सरोदे, योगेश मोरगे, चांगदेव देखणे, साजीद इनामदार, मोहन काले, अशोक दांडगे, भैय्या देशमुख, विरेंद्र सिंग, सोनु वांगा, शिवम शेळके, सचिन गुंजाळ, फारुख शेख, तिलक सोनार, मनोज राऊत, रोहन चव्हाण, निलेश चव्हाण, किरण पडवळकर, विजय पडवळकर, संजय पवार, सुरज पवार, सुनिल पवार, महार चव्हाण, सोमनाथ गांगुर्डे, भरत लोखंडे, सुमित शिंदे, निलेश शिंदे, राहुल मोरगे, शुभम शिवदे, सौरभ पवार, शुभम घोडके, कुणाल कारवाल, सोनू भुजबळ, शुभम तुरकीया, किशोर साळवे. प्रमोद चौधरी, अक्षय गोसावी. आकाश कोते, संकेत खंडागळे, आकाश पोटे आदिंसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here