माळवाडगाव/प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे धर्मनाथ बीज उत्सव सुरू असून याठिकाणी आज दि.१२ रोजी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य शांतिब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली,यावेळी अडबंगनाथ संस्थानला केलेल्या सेवेचे फळ व्याजासहित मिळाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शांतिब्रह्म गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी उपस्थित भाविकांना केले.

श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र भामाठाण येथे श्रीराम प्रभू लक्ष्मण भेटले असून या ठिकाणी सीता मातेच्या विरहामुळे दुःखी होऊन येथे अश्रू अनावर झाल्याने श्रीराम प्रभुंच्या अश्रूंची शिळा येथे तयार झाली आहे. त्याच शिळेवर अडबंगनाथांनी तपश्चर्या केली आहे.अडबंगनाथ यांचे मूळ नाव माणिक आहे,मात्र माणिक हे एक कोणी व्यक्ती,साधुसंत किंवा वस्तूचे नाव नसून एक रत्न आहे. हे रत्न आपल्याला मिळाले हे आपले भाग्य आहे.या परिसरातील नागरिक या स्थानापासून अनेक दिवस जात होते.मात्र या ठिकाणांची महती लोकांना माहिती नव्हती.मात्र योगीराज गंगागिरी महाराज यांचा संदेश सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांना झाला आणि त्यांनी सांगितले की,अडबंगनाथ संस्थान येथे प्रकाश पाडायचा आहे आणि प्रकाश पाडण्यासाठी कोणीतरी अरुणची येथे गरज आहे येथे अरुणोदय होण्यासाठीच अरुणची निर्मिती झाली आणि अरुणनाथगिरी महाराज येथे आले त्यांचा एकच नियम असतो.तो म्हणजे जे काही करायचे ते गुरूंच्या कृपेने आणि त्यांनी सद्गुरुच्या आशीर्वादाने येथे भव्य दिव्य असे मंदिराचे काम उभारले आहे.अडबंगनाथ संस्थानचे सर्व दायित्व अरुणनाथगिरी महाराज यांनी आपल्या खांद्यावर घेतलेले आहे.तसेच जेवढे नाथांनी करायला सांगितले आहे तेवढेच अरुणनाथगिरी महाराज गुरु निष्ठेने करत आहे.हा मृत्यु लोक आहे,येथे जन्म घेणारा जाणारच आहे, त्यामुळे आपल्याला त्याचे दुःख मानायची गरज नाही.अडबंगनाथ संस्थान हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.जेथे नदी वाहते त्याला तीर्थ आणि जे ते लोक राहतात त्याला क्षेत्र म्हणतात, त्यामुळे आपले श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान हे तीर्थक्षेत्र पवित्र आहे आणि आपले अडबंगनाथ संस्थान हे एक सत्संगाचे केंद्र देखील आहे तसेच धर्मनाथ बीज अतिशय महत्त्वाची आहे.तसेच आपण सर्वच या पवित्र ठिकाणी जमलो आहोत या ठिकाणी जे काही काम चालू आहे ते काम चालूच असणार आहे आणि भाविकांनी देखील येथे सहकार्य करावे तसेच येथे सेवा केल्यास त्याचे फळ आपल्याला व्याजासहित मिळाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शांतिब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना केले.


यावेळी अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी शांतीब्रम्ह भास्करगिरी महाराज यांचा सत्कार करुन आशीर्वाद घेतले तसेच यावेळी उपस्थितांचे देखील स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी आभार मानले तसेच यावेळी बोलताना स्वामी अरुणनाथगिरी महाराज म्हणाले की भास्करगिरी महाराजांच्या रूपात मला साक्षात सदगुरू नारायणगिरी महाराज दिसतात आणि या जगात माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रथम गुरु आणि आता सध्या आहे ते शांतीब्रम्ह गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि दुसरे श्री श्री 1008 रामदासजी महाराज कर्नाल हरियाणा हे असल्याचे स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी यावेळी उपस्थित भाविकांना सांगितले. तसेच अडबंगनाथ संस्थान येथे सुरू असलेल्या विकास कामासाठी देखील भाविक भक्तांनी यथाशक्ति प्रमाणे दान करावे याठिकाणी अनेक विकास कामे संस्थानच्या वतीने सुरू आहे. त्यामुळे त्यासाठी भाविकांनी सहकार्य केल्यास त्याचे फळ आपल्याला निश्चित मिळणारच आहे आणि गुरुवर्य शांतिब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांनीदेखील आपल्याला सर्वांना आशीर्वाद दिला आहे.आज या ठिकाणी आपल्या सर्वांना गुरुवर्य शांतिब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या दर्शनाचा योग आला हे आपले भाग्यच आहे असेही यावेळी स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी सांगितले तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी अडबंगनाथ प्रकट दिन या ठिकाणी साजरा केला जात असतो या समारंभाला देखील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी केले आहे.या समारंभास परिसरातील भाविक भक्त मान्यवर पत्रकार या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here