श्रीरामपुर/प्रतिनिधी :- महान विचारवंत व अपार संघटन क्षमता असलेले थोर पुरुष पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांचा विचारावर भारतीय जनता पार्टी चालते व ज्यांचे अंतोदय व एकात्म मानववाद या मुलमंत्र वर भारतीय जनता पार्टी चे कामकाज चालते त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन सामान्य कार्यकर्ते सदैव कार्यरत असता अशा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा नेतृत्वाखाली व जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी व शहराध्यक्ष मारुती बिंगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर तर्फे लोकमान्य टिळक वाचनालय या ठिकाणी सकाळी १० वाजता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास नागरिकाचा समाधानकारक प्रतिसाद लाभला व गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतला व यावेळी चष्मे देण्यात आले ज्यांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्यांना हडफसर, पुणे येथील एच. व्ही. देसाई आय केर हॉस्पिटल याठिकाणी पाठवण्यात येणार आहे व त्यांना जाण्या येण्याची सोय मोफत करण्यात आली आहे.यावेळी श्रीरामपूर भाजपा चे नेते गणेश राठी, शिक्षक आघाडी चे जिल्हा संयोजक शशिकांत कडूस्कर, शहराध्यक्ष मारुती बिंगले, राजेंद्र कांबळे, रामभाऊ तरस,अजित बाबेल, अरुण धर्माधिकारी, मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब अहिरे, युवा मोर्चा चे युवानेते अक्षय वर्पे, विशाल यादव, आनंद बुधेकर, रवी पंडित, किरण जगताप, रुपेश हरकल, ओंकार झीरंगे, अक्षय नागरे, अमोल अंबिलवादे आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here