(राहुरी प्रतिनिधी) – १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती ऊत्सवाची तयारी करण्यासाठी राहुरी येथे बैठक पार पडली.यावेळी शिवजयंती ऊत्सव समितीचे सर्व नियोजन करण्याचा मान महिलांना देण्यात आला.
बैठकीत चिठ्ठी टाकून कार्यकार्यणी ठरविण्यात आली.प्रथम चिठ्ठी सौ.दिपाली अडसुरे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून सौ.राजश्री घाडगे यांची निवड करण्यात आली.खजिदार सौ.रुपाली रासने सहखजिनदार सौ.वैशाली शेळके,कार्याध्यक्ष सौ.जानका लबडे तर नियोजन समिती सदस्य मध्ये सौ.अनिता शेंडे,सौ.पुनम शेंडे,सौ.लगे सुजाता,सौ.ज्योती नालकर यांची निवड करण्यात आली.

कोविड रोगाचा पार्श्वभूमीवर शिवजयंती ऊत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.शिवजयंती निमित्ताने सालाबादाप्रमाणे आनंद ऋषीजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातुच्या मुर्तीची पालखीत स्थापना करून पुजन करण्यात येणार आहे.पुजन झाल्यानंतर सर्वधर्मातील भगीनींना पालखीला खांदा देण्याचा मान ठरले आहे.पालखी मिरवणूकीला दु.२ वाजता सुरवात करण्यात येईल.पालखी मिरवणूकीमध्ये यावर्षी कुठल्याही प्रकारचे वाद्य वाजवाले जानार नाहीत. मिरवणूकीच्या अगोदर महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करुन वाण म्हणून सॕनिटायझर व मास्क वाटले जाणार आहेत.या कार्यक्रमात कु.गायत्री झिने यांचा पोवाड्याचा कार्यक्रम तर कु.प्राजक्त वाघ यांचा सिंहगर्जना घोषणा होणार आहे. पालखी मिरवाणूक गोकुळ काॕलनी – नवि पेठ – शनि चौक – छ.शिवाजी चौक – शुक्लेश्वर चौक मार्गाने आडवी पेठेतुन पृथ्वी काॕर्नर मार्गाने आनंद ऋषीजी उद्यानात सांगता करण्यात येईल.

या बैठकीस सौ.अश्विनी कल्हापुरे,सौ.वर्षा लांबे,सौ.सुरेखा माकोणे,सौ.मनिषा तनपुरे,अॕड.मनिषा आढाव,सौ.रितीका कल्हापुरे,कु.शेजल ढेपे,कु.नम्रता उंडे,कु.वैष्णवी देहेडराय,सौ.मनिषा पठाडे,कु.किर्ती लांबे,कु.श्रध्दा धुमाळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here