श्रीरामपूर(वार्ताहर)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देण्यासाठी या अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या आयोजन करण्यात येत असते यातुन विध्यार्थ्यीना सुप्त गुणाना वाव मिळुन शास्त्रज्ञ होण्याची संधी मिळते ही उपकरणे शाळेतच तयार करावित असे प्रतिपादन विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये यांनी सांगितले.येथील हिंद सेवा मंडळाच्या भि.रा.खटोड कन्या विद्यालय येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थीनीनी सहभाग ४० घेतला.यावेळी विद्यालयाचे चेअरमन अशोक उपाध्ये ,सुनिल कपिले, दिपक कèहाडे, विजय शेलार, मुख्याध्यापिका विजया तागड , उपमुख्याध्यापक आबासाहेब कापसे, पर्यवेक्षिका विद्या कुलकर्णी, मंगला डोळस व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

यावेळी दिपक कुऱ्हाडे यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन करुन त्यांचे कौतुक केले.सुत्रसंचलन मोनिका पारधी यांनी केले. तर अजय पुंड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here