नेवासा/प्रतिनिधी(सचिन कुरुंद) :- मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या कृषी महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध कार्याची दखल घेत अहमदनगर येथील गुणवत्ता नियंत्रण विभागाने सोनई कृषी महाविद्यालयास आयएसओ 9001:2015 हा दर्जा बहाल केला.महाविद्यालय चे विविध शैक्षणिक अन्य सुविधांची तपासणी अहमदनगर येथील गुणवत्ता नियंत्रण विभागाचे पंकज पाटील यांनी टीमसह नुकतीच केली.
हे A ग्रेड चे महाविद्यालय असून एकूण 720 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्या सुवर्णपदक मिळाले होते.क्रीडा क्षेत्रातही राज्यपातळीवर या महाविद्यालयाच्या टीमने विविध बक्षिसे मिळवली आहे.संस्कृतिक कार्यक्रमातही या महाविद्यालयाने विशेष प्रावीण्य मिळवले आहे.संस्थेचे संस्थापक मा.खा. यशवंतरावजी गडाख आणि अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे असणारी भव्य-दिव्य इमारत,सुसज्ज मैदाने, प्रयोगशाळा ,ग्रंथालय, भौतिक सुविधा, वनराईने नटलेला परिसर विद्यार्थी-विद्यार्थिनी वस्तीगृह, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग ,विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या विविध सुख सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. महाविद्यालयाला आयएसओ मानांकन मिळावे यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे सर्व प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांनी,विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.आयएसओ मिळाल्याबद्दल मा.खा.यशवंतरावजी गडाख, राज्याचे मृग व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ.विनायक देशमुख यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे सर्व महाविद्यालय स्टाफ व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.