श्रीरामपूर/प्रतिनिधी – पुणतांबा मार्गावरील ८: ३० वाजेच्या सुमारास, किरण रमेश फुलारे हा २४ वर्षीय युवक, निमगाव खैरी येथून गोंधवणी इथे परत येत असताना, या रस्त्याच्या कडेला उभ्या, एम एच १७ बी एक्स ०९९९ या उसाच्या ट्रॅलीला, पुढून धडकल्याने भीषण अपघात झाला, सदरचा अपघाता इतका भीषण होता की, या अपघातात किरण फुलारे या २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, अपघाता संदर्भात माहिती मिळताच गावातील काही तरुणांनी अम्ब्युलन्सला फोन केला, काही वेळात अम्ब्युलन्स देखील घटनास्थळी दाखल झाली, मात्र युवकाचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात शोककळा पसरली, अपघात संदर्भात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात , गुन्हा रजिस्टर नं १३/२०२१ मोटार अपघात कायदया अंतर्गत भा.द. वी. कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, या अपघाताचा पुढील तपास, पोलीस निरीक्षक खान यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार अडांगळे हे करीत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here