नेवासा/प्रतिनिधी(सचिन कुरुंद ) :- तालुक्यातील पाचुंदा येथील विवाहित महिलेचा घरगुती कारणावरून व गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत यासाठी छळ केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात आठ जणांवर पैशासाठी छळाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शारदा अमोल खरात(वय25)रा.पाचुंदा. ता.नेवासा. हल्ली रा.देवगाव.ता.नेवासा हिने फिर्याद दिली असून त्यावरून अमोल भाऊसाहेब खरात, भाऊसाहेब रंभाजी खरात, लंका भाऊसाहेब खरात, पाराजी रंभाजी खरात, पुष्पा पाराजी खरात, पांडुरंग रंभाजी खरात, सारिका पांडुरंग खरात,व वैभव पांडुरंग खरात सर्व रा.पाचुंदा.ता.नेवासा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, 2007 पासून सासरी नांदत असताना फिर्यादी हिस घरगुती कारणावरून व गाडी घेण्याकरिता माहेरून दोन लाख रुपये आणत नाही या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करून उपाशीपोटी शारीरिक व मानसिक छळ करून माहेरून पैसे आणले नाहीत तर तुला व तुझ्या मुलांना जिवंत मारून टाकू अशी धमकी दिली जात होती.फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 84/2021 भारतीय दंड विधान कलम 498(अ) 323,504,506,34 या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस नाईक के.आर.काळे हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here