श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरातील नॉर्दन ब्रँच ते मिल्लतनगर रस्त्यावर, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस रात्रीची गस्त घालत असतांना, त्या ठिकाणी एम एच १७ पी ५५७७ क्रमांकाची दुचाकी झाडाला, आढळलेल्या सस्थितीत निदर्शना आल्याने, पोलिसांनी कॅनॉल सह परिसरात शोध घेतला, मात्र कॅनॉलला पाणी असल्याने कोणीही आढळून नाही, मात्र सकाळी १० वाजेच्या सुमारास, शहरातील अक्षय कॉर्नर येथील पुलाखाली, एका युवकाचा मृतदेह वाहून आल्याने, परिसरात खळबळ उडाली, यावेळी स्थानिक नागरीकांनी पोलिसांना खबर दिली, त्यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे व वाघमारे, तात्काळ घटनास्थळी जाऊन, मृतदेह ताब्यात घेतला, सदर मृत युवकाच्या खिशातून आधारकार्ड तसेच मतदान ओळखपत्रामुळे , मयत युवकाचे नाव जुनेद झाकीर पटेल असून, हा ३० वर्षीय युवक समृद्धी महामार्गाच्या कामावरील ठरकेदार असून, तालुक्यातील जाफराबाद येथील मूळ रहिवाशी असून ,सध्या तो मिल्लतनगर येथे राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांच्या दिली असून, या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ९/ २०२१ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे व वाघमारे हे करीत आहे, सदर ३० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाताहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here