श्रीरामपूर/प्रतिनिधी :- स्थानकवासी जैन संघ ए १६८ याठिकाणी, १९९७ साली झालेल्या निवडणुकी नंतर निवडून दिलेल्या, ट्रस्टींच्या मार्गदर्शनाखाली जैन संघाचे काम आजतागायत सुरू आहे, दर ५ वर्षा नंतर नवीन ट्रस्टीची निवड करणे बंधनकारक असतांना देखील, तसेच न करता जुन्या ट्रस्टींच्या मार्गदर्शनाखाली, मनमानी कारभार सुरू ठेवला, तसेच कोणत्याही नवीन सभासद न करता, अरेरावी करत असल्याने, या विरोधात जैन समाजातील काही नागरीकांनी, धर्मादायुक्तांचा अहमदनगर यांच्याकडे ,यासंदर्भात तक्रार दाखल केली, या प्रकरणी धर्मादायुक्त यांनी , २८ फेब्रुवारी २०२० रोजी लोकशाहीच्या मार्गाने, फेर निवडणुका घेण्याचे लेखी आदेश दिले, यावर स्थानकवासी जैन संघाच्या ट्रस्टींनी, ७१० सभासदां पैकी ४८१ सभासदांना लाभार्थी दाखवत, केवळ आपल्या जवळच्या ८१ लोकांना संघ सभासद दाखवून, निवडणूक झाल्याचे दाखविले, एवढेच नाही तर प्रसिद्ध केलेया1ल्या सभासदांच्या यादीत जे सभासद जिवंत आहेत त्यांना मयत आणि मयत असणाऱ्या सभासदांना जिवंत दाखवत, धर्मादायुक्तांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केलाय, अनियमिते संदर्भात श्रीरामपूर न्यायालयात ,स्थानकवासी जैन संघाच्या ट्रस्टीं विरोधात, धर्मादायुक्तांनी खटला दाखल केलेला असतांना, ट्रस्टींच्या बाजूने वकीलपत्र स्वीकारणा-या वकिलाच्या देखरेखी खालीच, श्रीरामपूर स्थानकवासी जैन संघाच्या ट्रस्टींची निवडणूक होत असल्याने, संशय व्यक्त केला जात आहे, जैन संघात चाललेला हा सर्व प्रकार, जैन समाजातील इतर सभासदांच्या लक्षात आला असता, त्यांनी या संदर्भात विचारणा करताच, सभासदांना उडवा उडवीची उत्तरे देऊन, समाजाने निर्माण केलेली ही भव्य वास्तू, खाजगीकरण करण्याचा मनसुबा ह्या ट्रस्टींनी आखल्याचा आरोप, संघातील जैन सभासदांनी केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here