श्रीरामपुर/प्रतिनिधी :- नगरपालिका आपल्या कर्तव्याचे पालन करत नसल्याने शहरातल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरामध्ये घनकचरा संकलनाचा काम केवळ तीन ते चार गाड्या करत असल्यामुळे शहरांमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडलेले असतात

एकीकडे देशामध्ये कोरोना महामारी च्या संक्रमणामुळे नागरिक खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत तर दुसरीकडे श्रीरामपुर शहरात नगरपालिकेच्या वतीने नियमित साफसफाईचे काम होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे याचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना वारंवार सूचित करून सुद्धा गावातील साफसफाई होत नाही ही बाब गंभीर आहे एकाच ठिकाणी १५ – २० दिवस कचऱ्याचे ढिगार लागलेले असतात कचरा उचलण्यासाठी नागरिक सतत फोन करत असतात तरी प्रभागातला कचरा उचलण्यासाठी घनकचरा गाड्या पोहोचत नाही व संबंधित विभागाचे कर्मचारी व अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष का करत आहे हेच समजत नाही वारंवार तक्रारी करून सुद्धा संबंधित ठेकेदारावर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी कारवाई का करत नाही हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे शहरांमध्ये नियमित कचरा संकलन होणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार व नागरिक आजारी पडणार नाही शहरांमध्ये मूलभूत सुविधा देण्याचे काम हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे असते परंतु श्रीरामपुर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचा कोणत्याही प्रकारचा नियंत्रण या नगरपालिकेवर व कर्मचाऱ्यांवर नाही श्रीरामपूर गोंधवणी वॉर्ड नं १ मधील प्रभाग क्र १ येतील पूर्ण परिसरात घाणीचा साम्राज्य तेथील नागरिक त्रस्त झाले आहे १० दिवसापासून नगरपालिका येतील नाली सफाई कामगार आले नाहीत व येतील गटार नाली तुंबलेले आहेत याचा त्रास नागरिकांना होत आहे त्या नाली मुले स्थानिक लोक त्रस्त झाले याकडे रोज रस्त्यावरून तेथील नगरसेवक येत जात असून दुर्लक्ष करत आहेत व लोकांनी वारंवार तक्रारी करून देखील नगरसेवक दुर्लक्ष करत आहेत अश्या घानीचे साम्राज्याने दुर्गंधी पसरत आहे यामुळे लोकांमध्ये रोगराही वाढण्याचा प्रमाण वाढत आहे त्वरित नगरपालिका व स्थानिक पदाधिकारीने दखल घेऊन लवकरात लवकर या भागातील साफ सफाई चे काम करावे असे स्थानिक लोकांकडून मागणी होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here