अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान श्रीरामपूरला

श्रीरामपूर/प्रतिनिधी(गौरव डेंगळे) :- उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन होत असून या स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचे नेतृत्व श्रीरामपूरचा शिवम लोडे करणार आहे. नुकताच अहमदनगर येथे झालेल्या सब ज्युनिअर(१६ वर्षा खालील) व कनिष्ठ(२१ वर्षा खालील) धनुर्विद्या स्पर्धेत श्रीरामपूरच्या शुभम लोडे यांनी ५ सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपलं स्थान पक्के केल्या.शुभम श्रीरामपूर येथील येस जे पाटणी विद्यालय मध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. धनुर्विद्या खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री अभिजीत दळवी व श्री सचिन घावटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो मागील तीन वर्षापासून कसून सराव करत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत शिवम आपल्या श्रीरामपूर तालुक्याच्या नक्कीच उंचावेल.
राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शुभमचे वडील श्री दिपक लोडे,श्री काकासाहेब चौधरी, प्रा पवार, प्रा संभाजी ढेरे,श्री नितीन बलराज, गिरीश कुऱ्हे,श्री सोनावणे,श्री प्रकाश ढोणे आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here