नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- ततालुक्यातील गिडेगाव येथे मुळा सहकारी साखर कारखाना पदाधिकारी व जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या भव्य नागरी सत्कार समारंभाप्रसंगी जेष्ठ नेते मा.खा.यशवंतरावजी गडाख अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .यावेळी मृद , जलसंधारण मंत्री ना.शंकररावजी गडाख, ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष डाॅ.मा.आ.नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष मा.आ.पांडुरंग अभंग , मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर ,उपाध्यक्ष कडुबाळ कर्डीले तसेच जिल्हा बॅंक, ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याच्या बिनविरोध निवडुन आलेल्या संचालक मंडळाचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला . ते पुढे म्हणाले कि आज तालुक्यात ४० लाख टन उस गाळपासाठी उपलब्ध आहे . स्व . मारुतरावजी घुलें बरोबर काम करताना जिल्हा बॅंकेतून तालुक्यातील शेतकर्यांना पाईपलाईनसाठी कर्ज उपलब्ध करून दिले त्यातून या बॅकवाॅटर भागाचा विकास होऊन समृद्धी नांदत आहे .
यावेळी नरेंद्र घुले म्हणाले की स्व . मारुतरावजी घुले व मा.खा.यशवंतरावजी गडाख यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून गेली चाळीस वर्ष तालुक्यातील सर्व संस्था व्यवस्थित चालवल्या . ती परंपरा कायम राखण्याच काम आम्ही करू. तर जायकवाडी पाणी परवान्याचे अठरा वर्षाचे नुतनीकरण करणे गरजेचे असून शेतकर्यांनी ते करावे . यामध्ये शेतकर्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले . पाटपाण्याचे नियोजन व्यवस्थित होत असून विज पाणी रस्ते शेतकर्यांसाठी महत्वाचे असून नामदार शंकरराव गडाख यावर सकारात्मकपणे व स्वतः दक्ष राहून काम करत असल्याचे सांगत त्यांनी ना . गडाखांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले .
तर यावेळी ना . गडाख म्हणाले कि दोन्ही कारखान्याच्या निवडणूका बिनविरोध करण्यात कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे.मिळालेले मंत्री पद जनतेमुळे आहे.या मंत्रिपदाची डोक्यात हवा कधीही जाऊ देणार नाही.सदैव जनतेच्या सेवेसाठी कटीबद्ध राहू,पाण्याने समृद्ध असणारा गोदावरी पट्यातील शेतकरी हा खऱ्या अर्थाने नशीबवान आहे.जोडीला ते कष्ट घेतात त्यामुळे ही समृद्धी येथे दिसून येते.तालुक्यातील सर्वच गावांना विकासकामात प्राधान्य देणार आहे तसेच मंत्री पदा नंतर लगेच कोरोना आला त्यामुळे आपली भेट सार्वजनिक स्वरूपात होऊ शकली नाही.ती संधी आज गिडेगावकरांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी गिडेगाव येथील नागरिकांचे आभार मानले.
सत्तेत नेता आपला असल्याने विकासाचा अनुशेष सक्षमपणे भरून काढत . ना गडाखांची कामगिरी नेत्रदिपक असेल असा विश्वास व्यक्त करत त्यांना आमचे कायम सहकार्य राहील . मा.आ.नरेंद्र घुले.
मंत्रीपदाची हवा डोक्यात जावू न देता शेतकरी हित व सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार . ना . गडाख.
कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांनी कार्यक्रम संपल्यानंतर मंडपात सर्वसामान्यासारख बसून कार्यकर्त्यांमध्ये दाळबट्टी जेवनाचा आस्वाद घेतला . त्यांचा हा साधेपणा उपस्थितांना चांगलाच भावला.

यावेळी पाडुरंग अभंग ,अनिलराव मते,श्रीरंग हारदे, देसाईआबा देशमूख यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भगवानराव कर्डिले यानी केले .

कार्यक्रमासाठी ज्ञानदेव वाफारे, जि . प . सदस्य दादासाहेब शेळके ,पं स . सभापती रावसाहेब कांगुणे,बाळासाहेब साळुंके, तुकाराम मिसाळ , नानासाहेब तुवर ,नारायण लोखंडे, लक्ष्मण जगताप ,जनार्दन कदम,बापुसाहेब कर्डीले ,बाळासाहेब पाटील,कैलास झगरे,भीमाशंकर वरखडे,अजय साबळे,बबनराव भुसारी,काकासाहेब शिंदे, काशिनाथ नवले ,भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गंडाळ, शिवाजी कोलते, मच्छिंद्र म्हस्के, नानासाहेब रेपाळे, बाबासाहेब भणगे ,सोपान पंडित ,बापूसाहेब जंगले, संजय जंगले ,रंगनाथ जंगले, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब परदेशी ,बबनराव दरंदले, योगेश म्हस्के ,जबाजी फाटके,प्रभाकर कर्डिले, निलेश शेळके ,रामकिसन शेळके, गणेश ढोकणे, अझर शेख ,सुनिल नजन ,अंबादास गोरे, दिलीप मते, नानासाहेब नवथर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ रेवन्नाथ पवार पवार यांनी केले तर मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले यांनी उपस्थितांचे आभार मानले.