श्रीरामपूर (वार्ताहर)- शिक्षणानेच पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होतो अशी महान शिकवण देणारे , भक्ती व परमार्थाच्या मार्गाने समाजात जागृती करणारे थोर संत सेवालाल महाराज यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करते असे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाले.

येथील लोकमान्य टिळक वाचनालयमध्ये नगरपालिकेच्यावतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस हार घालुन अभिवादंन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले यावेळी त्या बोलत होत्या यावेळी नगरसेवक रवि पाटिल, मुक्ताहर शहा, कलीम कुरेशी,राजेंद्र पवार,अलतमश पटेल, अर्जुन आदिक, समित मुथ्था,एस.के.खान, ग्रथपाल गायकवाड आदि उपस्थित होते.

आदिक म्हणाल्या, संत सेवालाल महाराजांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दारूबंदी करून स्त्रियांना अधिकार दिले. बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची अावड हाेती. हे ओळखूूून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून अाणले. संत सेवालाल हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here