श्रीरामपूर/प्रतिनिधी(गौरव डेंगळे) :-महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, अहमदनगर जिल्हा व स्वराज क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय निवड चाचणी नुकतीच अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती.

खानापूर येथील जानकीबाई वामनराव आदिक माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कु ईश्वरी चौधरी हिने सबज्युनियर गटामध्ये सहभाग नोंदवला होता.या निवड चाचणी मध्ये ईश्वरी ने एकूण ३ सुवर्णपदके पटकावून दिनांक २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपली निवड निश्चित केली. ग्रामीण भागातील मुलीने धनुर्विद्या सारख्या खेळामध्ये श्रीरामपूर तालुक्याचा नाव राज्यामध्ये गाजवले आहे. ईश्वरीला आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक श्री अभिजीत दळवी,श्री सचिन घावटे, क्रीडाशिक्षक श्री काकासाहेब चौधरी,श्री दिपकराव लोटे आदींचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ईश्वरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री अविनाश आदिक,नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,श्री हंसराज आदिक,श्री जयंत चौधरी,श्री सुनील थोरात, मुख्याध्यापक श्री बहिरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here