नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून विजय करे यांनी पदभार स्वीकारला आहे.
नेवासा चे पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांची नगर येथे बदली झाल्यानंतर अहमदनगर पोलिस घटकाचे आस्थापनेवर हजर झालेले परिविक्षाधीन भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी अभिनव त्यागी यांनी मंगळवार दि.27 ऑक्टोबर रोजी नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.त्यांचा प्रशिक्षणार्थी कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी 25 जानेवारी 2021 मध्ये नेवासा पोलीस ठाण्याच्या पदभार सोडला होता.तेंव्हा पासून सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर यांचे कडे प्रभारी पदभार देण्यात आला होता.नेवासा पोलिस ठाण्यासाठी कार्यक्षम अशा पोलिस निरीक्षकाची प्रतिक्षा होती.सध्या पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक विजय मारुती करे यांनी आज नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.त्यामुळे नेवासा पोलिस ठाण्याच्या प्रभारीराज संपुष्टात आला आहे.