अहमदनगर :-  पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हा युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस आणि नगर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने झोपडी कॅन्टीन येथील दीपक पेट्रोल पंपावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले,महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ.सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा युवक अध्यक्ष स्मितलभैया वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनात शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटोळे नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट युवा नेते अंकुश शेळके, विशाल कळमकर, राजू बोरुडे, सुजित जगताप, विशाल घोलप आदी युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. देशातील युवक आणि महिलांच्या भावना नागरिकांच्या गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या संदर्भातील भावना अत्यंत तीव्र आहेत. मोदी सरकारने पेहेले इस्तेमाल करो, फिर विश्वासघात करो अशा पद्धतीने देशातील जनतेची घोर फसवणूक केली आहे.

स्मितलभैया वाबळे म्हणाले की, मोदी सरकारच्या या भाववाढीमुळे सामान्य माणसाचे मासिक बजेट कोलमडून पडले आहे. महिला भगिनींना घर चालवताना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

मयूर पाटोळे म्हणाले की, युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही केंद्र सरकारचा तीव्र निषेध करतो. देशातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर असताना आता झालेली वाढ ही मनस्ताप देणारी आहे. ॲड. अक्षय कुलट म्हणाले की, आधीच शेतकरी आंदोलन देशात पेटले असताना या दरवाढीमुळे ग्रामीण भागात देखील मोठा फटका बसला आहे. कार्यकर्त्यांकडून मोदींच्या प्रतिमेला जोड्यांची फटकेबाजी यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना मोदींच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला.


यावेळी पेट्रोल पंपाला चपलांचा हार घालण्यात आला. मोदी सरकार विरोधात दिलेल्या घोषणाबाजीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपाचा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी नागरिकांनी देखील काँग्रेसच्या या आंदोलनाचे स्वागत केले. आंदोलनामध्ये ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, नलिनीताई गायकवाड, सुनिता बागडे, कल्पना खंडागळे, उषा भगत, कौसर खान, रिजवान अहमद, मनोज लोंढे, गणेश आपरे, इम्रान बागवान, आशिष गुंदेचा, सुमित बाबर, योगेश दिवाने, योगेश जयस्वाल, सिद्धार्थ करांडे, मयुर घोरपडे, ऋषिकेश चितळकर, श्रीकांत शिंगोटे, वैभव बालटे, हर्षद तांबे, सौरभ निमसे, गणेश जाधव, अमित निमसे, सचिन आजबे, संकेत उगले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here