संगमनेर/प्रतिनिधी(गौरव डेंगळे) :-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या आधिपत्याखाली संगमनेर तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिंचपुर येथे गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे यांचे ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियान अंतर्गत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात नितीन भाऊ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना श्री मोरे म्हणाले की श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र म्हणजे मानव हित व राष्ट्रहित होय. सेवा केंद्राच्या माध्यमातून देश कल्याणाचे काम अविरतपणे सुरू आहे.हे कार्य परमपूज्य गुरुमाऊली यांनी सातासमुद्रापार नेऊन ठेवले आहे.आज जगभरात ६००० पेक्षा जास्त श्री स्वामी समर्थ समर्थ सेवा केंद्र असून या केंद्रांच्या माध्यमातून मानवी कल्याणाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.परम पुज्य गुरुमाऊलींनी हे कार्य अधिक अधिक सुलभ व्हावे व अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे म्हणून या कार्याची विभागणी देखील केली आहे.१८ पेक्षा जास्त विभाग या सेवा केंद्राच्या माध्यमातून राबवले जातात. म्हणूनच आपल्याला जर समर्थ व सशक्त भारत बनवायचा असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कार्य प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवायचे आवश्यकता आहे. सन २०२२ हे श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संस्थापक सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. विश्वशांतीचा हा संदेश घेऊन निघालेल्या या ग्राम व नागरी विकास अभियानातून सशक्त, सक्षम व वैभव शाली राष्ट्राची निर्मिती होणार आहे. ही ग्राम अभियान चळवळ आता अधिक व्यापक होऊन २०२२ सालापर्यंत या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची कार्य गावागावात तसेच शहराशहरात प्रसारित होण्यास आणखी लाखो हातांची गरज आहे.या राष्ट्रहिताच्या कार्यात आपण स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन देश कल्याणाचे कार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here