नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- तालुक्यात आज महसूल विजय सप्तपदी अभियानास सुरुवात शहरातील पंचायत समिती हॉल येथे आज १२ वा. महसूल विजय सप्तपदी अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित असणार आहेत.

या अभियान अंतर्गत मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ खालील प्रकरणे निर्गत करणे, पोटखराबा वर्ग -अ क्षेत्र लागवडी खाली आणणे, गावनकाशा/वाहिवाटीचे रस्ते मोकळे करणे, गाव तिथे स्मशानभूमी, तुकडे नियमतीकरण मोहीम, महा आवास घरकुल अतिक्रमण नियमतीकरण, प्रलंबित खंडकरी जमीन वाटप या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

जमिनीशी संबंधित कायद्यामध्ये सुधारणा झाली, पण त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. कायदे कागदावरच राहतात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. त्यामुळे महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येत आहे. – तहसीलदार रुपेशकुमार सुराणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here