नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- तालुक्यातील श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांची जन्मभूमी श्री क्षेत्र गोधेगाव येथे संतपूजन सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मानवी देह ही जीवनातील शेवटची संधी असल्याने संत संगतीत व भगवंताच्या भक्तीत राहून नरदेहाचा उध्दार करा असे आवाहन आळंदी येथील कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांनी यावेळी बोलताना केले.

श्री क्षेत्र गोधेगाव येथील युवा सरपंच राजेंद्र गोलांडे यांनी कै.जगन्नाथ गोलांडे व जनाबाई गोलांडे या आपल्या आजी आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या जन्मभूमी मंदिर प्रांगणात आयोजित संत पूजन सोहळा कार्यक्रमात ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम हे बोलत होते. यावेळी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या जन्मभूमी स्थानाचे व प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले तसेच कै.जगन्नाथ गोलांडे व कै.जनाबाई गोलांडे यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गोलांडे परिवारांच्या वतीने दत्तात्रय गोलांडे,शिवाजीराव गोलांडे,सरपंच राजेंद्र गोलांडे, अभिषेक गोलांडे यांनी उपस्थित संत महंतांचे स्वागत करून संतपूजन केले.

यावेळी बोलताना हभप ज्ञानेश्वर माऊली कदम म्हणाले की नरदेह आत्म उध्दार करण्याची शेवटची संधी असल्याने संत संगतीत व भगवंत चिंतनात राहून आत्म उध्दार करून जीवनाचे सोने करा असे आवाहन करून त्यांनी देव व भक्त यांचे नाते सांगणारा महिमा झालेल्या कीर्तनात बोलताना व्यक्त केला.

यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष रामनाथ महाराज पवार,गायनाचार्य अंकुश महाराज कादे,कृष्णा महाराज हारदे,पंढरीनाथ महाराज मिस्तरी,प्रविणभाऊ गडाख,गोरक्षनाथ महाराज जाधव, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,मृदुंगाचार्य लतीफमहाराज शेख,अॅड. गणेश पठाडे, बाजीराव नाना जाधव,कारभारी महाराज झरेकर, रामनाथ महाराज ठोंबरे, गणेश महाराज दरंदले, रामकृष्ण मुरदरे, सोपान महाराज पठाडे,संतसेवक बदाम महाराज पठाडे,अभिमन्यू महाराज चौधरी,ज्ञानदेव लोखंडे, सीताराम जाधव,सुभाष जाधव, श्रीधर अनभुले, कारभारी शेळके,मुरमेग्रामपंचायतचे मार्गदर्शक अजय साबळे उपस्थित होते.सरपंच राजेंद्र गोलांडे यांनी आभार मानले.
उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here