भोकर – शेतकर्‍यांची विज बंद करू नका, थकित बिल भरण्यास दोन महिन्याची मुदत द्या, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावू नका,व्यावसायीक व घरगुती विज ग्राहकांना इतर आकार बंद करून ग्राहकांची लुट थांबवा, रोहित्रांची दुरुस्ती करा आदी मागण्यांसाठी काल भोकर येथे क्षत्रीय बेलदार सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे व भोकरचे पसरपंच महेश पटारे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे एकतास शेतकरी व विज ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सध्या अनेक ठिकाणी रब्बीची पिक शेवटच्या पाण्यावर आहेत, अशा परीस्थीतीत शेतकर्‍यांचा विज पुरवठा खंडीत केल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. याच शेतकर्‍यांना थकित विज बिल भरण्यास मुदत दिल्यास शेतकर्‍यांचे नुकसान टळून आपली वसुली होईल.शेतात अनेक ठिकाणी विजवाहक तारा हाताच्या अंतरावर आल्या आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांच्या जीवितास धोका होवू शकतो, त्यामुळे त्वरीत अशा धोकादायक विजवाहक ओढून घ्या व अनेक रोहित्रांवरील लग्झ व फ्युज खराब आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करा.घरगुती, व्यापारी व व्यावसायिक विज ग्राहकांच्या मासिक बिलात इंधन आकार, स्थीर आकार आदी प्रकारचे आकाराची आकारणी करून या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे, ती थांबवा अन्यथा यापेक्षा तिव्र अंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अंदोलकांनी दिला. यावेळी क्षत्रीय बेलदार समाज सभेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश छल्लारे, भोकरचे उपसरपंच महेश पटारे, युवा कार्यकर्ते दिपक पटारे व प्रताप पटारे यांची भाषणे झाली.सुमारे तासभर चाललेल्या या रस्ता रोको आंदोलकांच्या विविध मागण्याचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे यांनी स्विकारत आपल्या सर्व मागण्या रास्त आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व मागण्या पुर्ण करू, सध्या कुठलेच रोहित्र बंद केले जाणार नाही. सध्या बंद असलेले रोहित्र सुरु करून देत आहोत.परंतू विज बिल वसुली शिवाय पर्याय नसल्याने विज बील वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत उर्वरीत मागण्यांबाबत तातडीने कारवाई करून चांगली सेवा देवू, असे आश्वासन यावेळी श्री. कांबळे यांनी आंदोलकांना दिले. त्यांचे समवेत महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रल्हाद टाक, लाईनमन कैलास घोळवे, गजेंद्र कासार आदिंसह कर्मचारी उपस्थीत होते. या रास्ता रोको दरम्यान श्रीरामपूर-नेवासा राज्य मार्गावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतुक खोळंबली होती.यावेळी अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे, राहुल अभंग, सतिष शेळके, रामदास शिंदे, भागवतराव पटारे, राजेंद्र चौधरी, राजेंद्र विधाटे, ज्ञानदेव चव्हाण, सुनिल विधाटे, नानासाहेब जगदाळे, भानुदास बेरड, रविंद्र मते, रमेश साठे, लहानु मते, आप्पासाहेब लोखंडे, रविंद्र आबुज, बजरंग पटारे, मुसा पठाण व राजेंद्र म्हसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी व विज ग्राहक उपस्थीत होते.श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. मसुद खान, पो. उप निरीक्षक अतुल बोरसे, पो. ना. आबा गोरे, पो. हे. कॉ. सतिष गोरे, रविंद्र पवार, आयुब शेख, पो. काँ. योगेश राऊत आदिंसह मोठा फौजफाटा उपस्थीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here