श्रीरामपूर/प्रतिनिधी :- तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ,श्री शक्ती ग्रुपच्या वतीने नेहमी समाज उपयोगी कार्यक्रमांचे केले जाते, या सर्वांच्या चालता, कोव्हिडंच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेल्या, मकर संक्रांती निमित्तचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम, १६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला, शहरातील लोकमान्य टिळक वाचनालय, याठिकाणी घेण्यात आलेल्या या हळदी कुंकू कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविल्याचे पाहिला मिळाले, या हळदी कुंकू कार्यक्रमासह, महिलांसाठी विविध खेळांचे देखील आयोजन करण्यात आले होते, उपस्थित महिलांनी देखील यावेळी खेळांचा मनमुराद आनंद लुटला. शक्ती ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या, हळदी कुंकूवाचा कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी आलेल्या महिलांना, हळदी कुंकूवासह वन म्हणून वृक्षांचे वाटप करण्यात आले, माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे व दिपाली ससाणेंच्या मार्गदर्शनाखाली, श्री शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा शिवानी शाह, उपाध्यक्ष मिनाक्षी पटेल, मयुरी गांधी,मंजू सावंत,अश्विनी परदेशी,माधुरी कोकाटे, भरती रासकर, माधुरी सोनवणे, चेतना पटेल, हेमा पद्मानी, अंजिली संचेती, आदींनी यशस्वीरीत्या पार पाडला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here