श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शहरातील मध्यवस्तीत असलेल्या, श्रीराम मंदिर लोणार गल्ली परिसरातील रहिवाशी, मधुकर पाथरकर व त्यांच्या पत्नी मीराबाई पाथरक, हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मीराबाई पाथरक यांच्या नावावर असलेली खोली, पालिकेने पाडल्याची माहिती, सदर पती पत्नी पुन्हा श्रीरामपूर येथे परत आल्यावर, त्यांना परिसरातील नागरिकांनी दिली, मात्र यांच्या स्व मालकीच्या ३५० स्क्वेअर फूट जागेवर, इतर नागरिकांनी अतिक्रमण केल्याने, पालिकेने, पाथरकर कुटुंबाची स्व मालकीची जागा ताब्यात द्यावी अशी मागणी करत, पाथरकर पती पत्नीने पालिके समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय, एकीकडे शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रम होत असतांना, आता या अतिक्रमणाचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत असल्याने, या संदर्भात पालिका प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here