नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- येथे शिवजयंती निमित्त व जागतिक सूर्यनमस्‍कार दिन निमित्त आज अहमदनगर जिल्हा अष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन व घटनापती प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांकडून आज सूर्यनमस्कार स्पर्धा घेऊन बक्षिसे वाटप करण्यात आले.
आज शिवजयंती निमित्त व जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त नेवासा येथील जि.प.मराठी मुलांच्या शाळेत अहमदनगर जिल्हा अष्टेडु मर्दानी आखाडा असोसिएशन व घटनापती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार स्पर्धा व शिव वंदना घेऊन शिवरायांना अभिवादन करण्यात आले.यावेळी नव्याने रुजू झालेले नेवासाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावून शिवरायांना अभिवादन केले.यावेळी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी झालेल्या कार्यक्रमास नगरसेविका शालिनीताई सुखदान, सामाजिक कार्यकर्ते संजय सुखदान, भाजपा तालुका अध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे ,मास्टर सुरेश लव्हाटे , पत्रकार सुधीर चव्हाण ,पत्रकार प्रसाद देशपांडे, पो.ह.गीते, अॅड.कदम, दीपक सोनवणे, नगरसेवक सचिन नागपुरे,अजय त्रिभुवन , बाळासाहेब तांबटकर आदींची उपस्थिती होती . या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियंका राहिंज, व्दितीय क्रमांक सिद्धार्थ धनक, तृतीय क्रमांक अमेय कुलकर्णी, चतुर्थ क्रमांक श्रेया पवार या विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here