नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- तालुक्यातील भानसहिवरा येथील संदेश जयंत काळे यांच्या घरासमोरून रात्री ३ चे सुमारास स्विफ्ट डिझायर गाडीचे चारही टायर (Car Tyres) डिस्क सहित चोरी गेल्याची घटना घडली आहे.

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे फिर्यादीत म्हटले आहे की, माझी आई सुजाता, वडील जयंत, भाऊ आदेश असे आम्ही एकत्र राहतो आमचे नेवासा ते शेवगाव जाणारे रोडवर भानसहिवरा गावात हॉटेल जयराज नावाचे हॉटेल असून ते मी चालवतो मी माझ्या हॉटेल कामासाठी स्विफ्ट ही चारचाकी गाई गाडी क्र. एम एच १७ बी.व्ही. ६७६८ ही घेतली असून, मी तिचा वापर करतो माझ्या गाडीस मागील व पुढच्या चाकास ब्रिजस्टोन कंपनीचे टायर आलेले होते.

रात्री ११ च्या सुमारास मी माझ्या हॉटेलचे कामकाज संपवून हॉटेल बंद करून माझी गाडी घरी घेऊन गेलो व गाडी घरासमोर लावली त्यानंतर जेवण करून रात्री १ वा आम्ही घरातील लोकांनी गप्पागोष्टी केल्या व त्यानंतर झोपी गेलो. अंदाजे पहाटे ३ वाजेच्या सुमारास माझे वडील जयंत सुधाकर काळे लघवीसाठी उठून बाहेर आले असता त्यांना माझी गाडी हिचे मागील व पुढील व्हील्स सहित चारही टायर कोणीतरी काढून नेलेले दिसले. तेव्हा माझ्या वडिलांनी आमहाला घरातील लोकांना उठवले व झाला प्रकार सांगितला तेव्हा आम्ही वरील गाडी चोरी गेलेल्या टायरचा व व्हीलचा आसपास शोध घेतला परंतु मिळून आले नाही. तेव्हा आमची खात्री झाली की आमच्या गाडीचे ब्रिजस्टोन कंपनीचे कार टायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत.
सदर फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुरनं.८६/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पो. नाईक बबन तमनर हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here