नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- खासदार सुजय विखे यांनी नेवासा येथे भाजप कार्यकर्ते तसेच स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांबरोबर भेटीगाठी घेऊन अडचणी बाबत चर्चा केली.
यावेळी खासदार विखे पाटील म्हणाले की गोरगरीब जनतेकरिता आरोग्य शिबिराचे आवश्यकता असल्याने नवीन मेमोरियल ट्रस्ट मार्फत भव्य आरोग्य सर्वरोग निदान शिबीर घेण्यात येईल. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाच्या बाबत तसेच शैक्षणिक अडचणी विषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब भदगले, भाजप तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, जि.प. सदस्य दत्तात्रय काळे, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग ऊभेदळ, सचिन देसरडा, निवृत्ती काळे, अॅड.अंबाडे,जानकीराम डौले, फारूख दारुवाले,रुपेश विखोना,सागर ठाणगे, भाऊसाहेब पठारे, दादा बोरकर, बाळासाहेब देवखिळे, डॉ. प्रमोद देवखिळे, शहराध्यक्ष सचिन पारखे, नगरसेवक सचिन नागपुरे, रवी सोनवणे अशोक वाकचौरे, राजेंद्र कडू, विजय दहिवडकर, विवेक अंबाडे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.