नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- पोलिस ठाण्याचे सूत्र हाती घेऊन अवघे 5 दिवस झालेले असतांनाच नवनियुक्त पोलिस निरीक्षक विजय करे यांनी अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पहिला दणका वाळू तस्करांना दिला असुन बेलपंढरी परिसरातून वाळू तस्करी होत असल्याची माहिती मिळताच काही मिनिटात धाड टाकून वाळूने भरलेला डंपर जप्त करून गुन्हा दाखल केल्याने वाळू तस्कर भयभीत झाले आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की, रात्री पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मोबाईलवर एक निनावी कॉल आला.त्याने बेलपंढरी शिवारात वाळू तस्करी होत असुम भालगाव रस्त्याने आल्यास वाळू भरत असलेल्या गाड्या व वाळू चोर सापडतील अशी माहिती दिली.माहिती मिळताच श्री.करे यांनी तातडणीने यंत्रणा कामास लावली, पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांना खाजगी वाहनाने जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार श्री.दाते,पोलीस कॉ. खंडागळे यांचे पथकाने वाळू तस्करी होत असलेल्या ठिकाणी धाड टाकली असता वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणला.

याबाबत पो. ना. राहुल बबन यादव (वय 32 वर्षे) यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली की, रात्री 22:40 याचे सुमारास मी व उपनिरीक्षक भरत दाते, पोकॉ गुंजाळ असे पोलीस ठाण्यात हजर असताना पोलीस निरीक्षक विजय करे यांना गुप्त बातमीदारा मर्फत बातमी मिळाली की बेलपांढरी शिवारात गोदावरी नदी पात्राजवळ एक वाहन अवैध रित्या वाळूचा उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक करत आहे. वाळू तस्कर अशी गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलिस निरीक्षक करे यांनी सदर ठिकाणी जावून कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने उपनिरीक्षक दाते यांनी तात्काळ दोन लायक पंचांना बोलावून घेऊन त्यांना बातमीतील हकीगत समजावुन सांगुन त्याच्या संमतीने छापाचे नियोजन केले व आम्ही वरिल पोलीस स्टाफ व पंच असे नेवासा पोलीस स्टेशनहुन 23:01 वा. खाजगी वाहनाने रवाना होवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आम्ही पोलीस स्टाफ व पंच असे आम्ही खात्री केली असता बेलपांढरी शिवारात गोदावरी नदीचे पात्राजवळ एक पांढ-या – फिक्क्ट निळे रंगाची सहा चाकी टिप्पर वाळुची चोरटी वाहतुक करत असलेला दिसला. तेव्हा सदर ठिकाणी अचानक मध्यरात्री ठिक 12:10 वा छापा टाकला असता सदर ठिकाणी एक पांढ-या – फिक्कट निळे रंगाचा टाटा कंपनीचा सहा चाकी टिप्पर विना नंबर 1613 मॉडेलचा असा असलेला वाळूने भरलेला टिप्पर जात असताना मिळून आला. तेव्हा सदर टिप्पर वरील चालक यास थांबवुन त्यास जागीच पकडुन त्यास त्याचे नाव-गाव विचारले त्याने त्याचे नाव अनिकेत उर्फ भाऊसाहेब विजय डावखर (वय-25 वर्षे) मुळ रा.वाशिम टोका, ता.नेवासा हल्ली रा .बारामती ता.बारामती जि.पुणे असे असल्याचे सांगीतले व त्यास सदर गाडीचा मालक तसेच वाळु वाहतुक परवानाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली.
तरी सदर गाडीची दोन पंचासमक्ष झडती घेता त्यात अंदाजे 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचा एक पांढ-या लाल रंगाचा टाटा कंपनीचा सहा चाकी टिप्पर विना नंबर 1613 मॉडेलचा जुना डंपर, 15,000 रुपये किंमतीची 3 ब्रास वाळु असा एकूण 4 लाख 65 हजार रुपये किंमतीची मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

शासनाचे मालकीची वाळु चोरुन घेवुन जात असतान टिप्पर विना नंबरचा मिळुन आल्याने उपनिरीक्षक दाते यांनी पंचनामा करुन ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पोलिस स्टेशनला घेऊन आलो आहे. सदरचे टिप्पर चालक व मालक यांचे विरुध्द भादवि कलम 379 तसेच गौण खनिज अधिनियम कलम 3/15 प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे .पुढील तपास उपनिरीक्षक भरत दाते करत आहेत.

तालुक्यातील अवैध दारू विक्री,मटका-जुगार,वाळू तस्करी हे धंदे बंद करावेत.अन्यथा त्यांची वाट कशी लावायची हे पोलिसांना चांगलेच माहीत आहे. कारवाई करतांना टीप देऊन बातमी लिक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही गय केली जाणार नाही. – विजय करे, पोलिस निरीक्षक, नेवासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here