श्रीरामपूर(वार्ताहर)- महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांच्या विचारानेच आम्ही पालिकेत नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे प्रतिपादन नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी केले.
संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील प्रभाग क्रमाक ४ मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान दोनदिवसाचे राबवण्यात आले.यावेळी नगरसेवक प्रकाश ढोकणे ,माजी नगरसेविका अनिता ढोकणे, प्राध्यापक काळुके टायगर सर, रविद्र हरार, हरूनभाई शेख , रामकिसन देवरे, मौलाना यासीनभाई शेख, भिकाजी गालफाडे, सयाजी बनकर, अशोक अभंग ,रामदास ढोकणे ,भीमसेन कावरे ,महिला मंडळाच्या कस्तुराबाई सोनवणे, नंदाबाई कावरे, मथुराबाई शिंगारे, सुनिता ढोकणे, उषाताई लाड ,सिंधुबाई जमदाडे, आदि नागरिकांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवून सिद्धार्थ नगर परिसर स्वच्छ केला आहे.
यावेळी नगरसेवक प्रकाश ढोकणे म्हणाले, मागील सत्ताधिकारी कॉलेज परिसरातील भुयारीपुलाचे काम चुकीच्यापध्दतीने केल्यामुळे आज जाणाऱ्या येणाऱ्या नागिराकाना त्रास होत आहे. गटारीचे नियोजन व्यवस्थित न केल्यामुळे हा त्रास परिसरातील नागरिकाना सहनकरावा लागत आहे. तरी आम्ही जातीने लक्ष घालुन पाणी उपसामशिनने पाणी तात्काळ काढुन घेत आहे. विरोधकानी कचरा पालिकेसमोर आणुन टाकण्यापेक्षा स्वता:ने स्वच्छाता करावी भागात जमा झालेला कचरा उचलुन कचरा गाडीमध्ये टाकावा असे ते म्हणाले.