नेवासा/प्रतिनिधी (सचिन कुरुंद) :- नेवासा शहरात शुद्ध एरो पाण्याचे काईन बाॕक्स व्दारा वितरण सुविधाचा शुभारंभ नुकताच मोहिनीराज मंदिराजवळ करण्यात आला.
एरो कंपनीचे शुद्ध पाण्याचे वितरण केंद्र परिसरातील नागरिकांच्या आरोग्य चांगले रहावे या हेतूने १ रुपया, २ रुपये व ५ रुपये या नाण्याव्दारे माफक दरात २४ तास शुद्ध पाणी मिळण्याचे उपकरण बसविण्यात आले आहे. या कॉईन बॉक्स मशीनच्या सहाय्याने शहरातील सर्व नागरिकांना शुद्ध एरो कंपनीचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इथून पुढे कोणालाही अशुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार नाही. असे अभिजित मापरी यांनी सांगितले.या उपकरणाचे उद्घाटन नगराध्यक्ष सतीश पिंपळे व उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ना.शंकरराव गडाख पा. यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्तांशी संवाद साधला.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक संदीप बेहळे, नगरसेवक अंबादास इरले, नगरसेवक अल्ताफ पठाण, ॲड. के.एच.वाखुरे, भाऊसाहेब वाघ,राजेंद्र चौधरी,अनिल ताके,पोपट जिरे,सुनिल जाधव,अभय गुगळे, विनायक नळकांडे, सुनिल सांळुके,मुक्तार शेख,युसुफ बागवान, जावेद ईनामदार, सुलेमान मन्यार,शिवा राजगिरे,बाळासाहेब कोकणे, बाळासाहेब मारकळी, राजु शेंडे,भैया कावरे, राहुल देहाडराय, विशाल सुरडे,जालु गवळी,मुकुंद तवले,शोएब पठाण, पंकज जेधे,राम चव्हाण,छोटु उगले आदी उपस्थित होते.
या प्रसंगी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप ,नगरसेवक आसिफ पठाण, मुळा कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे व संचालक शिवा जंगले पा. तसेच कोरोणा योद्धा पत्रकार अभिषेक गाडेकर यांचा सत्कार अमित मापारी यांनी केला व महेश मापारी यांनी आभार मानले .