श्रीरामपूर(प्रतिनिधी)- गेल्या ५ वर्षांपासून प्रभागातील महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेणाऱ्या जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी यंदाच्या हळदी कुंकूवाला प्रभागातील समस्यांची लेखी माहिती घेण्याचा अभिनव उपक्रम घेतल्याने सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगरसेविका स्नेहल खोरे यांनी मोरया फाउंडेशनच्या माध्यमातून यंदाच्या हळदी कुंकू समारंभात प्रभागातील समस्यांची लेखी माहिती घेतली. ४ वर्षात केलेल्या कामांची माहिती देत आगामी काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकास आराखड्यासाठी महिलांच्या सूचना जाणून घेतल्या. हळदी कुंकूवाचे वाण म्हणून महिलांना कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मास्क देण्यात आले. प्रभागातील सर्व समस्या सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी स्नेहल खोरे यांनी उपस्थित महिलांना दिला.
यावेळी घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर लकी ड्रॉमध्ये पैठणी साडीचे पहिले बक्षीस कविता संतोष गोरे यांना मिळाले. डिझाइनर साडीचे दुसरे बक्षीस रुपाली सागर शिंदे तर चांदीच्या नाण्याचे तिसरे बक्षीस प्रीती जयंत कुलकर्णी यांना मिळाले. गायक फतुभाई सय्यद यांच्या आर्केस्ट्रोच्या गाण्यांनी महिलांचा हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी बेलापूर रोड, वढणे वस्ती, लक्ष्मीनगर, भळगट हॉस्पिटल परिसर, चौधरी वस्ती, राजेंद्र कॉम्प्लेक्स, उत्सव मंगल कार्यालय परिसर, रामचंद्र नगर, थत्ते मैदान परिसर, पूर्णवाद नगर, अंधशाळा परिसर, लबडे वस्ती, महादेव मळा, दक्षिण मुखी हनुमान मंदिर रोड, लक्ष्मी आई रोड, मसाला गल्ली, गौतमनगर, विद्या हौसिंग सोसायटी, प्रकाशनगर, इंद्रप्रस्थ सोसायटी, अशोका पार्क, बालाजी टॉवर्स, निलकंठ रेसिडेन्सी, शांताई अपार्टमेंट, समता कॉलनी, श्री कॉलनी, विद्या विहार शिक्षक कॉलनी, एलआयसी कॉलनी, पटेल हायस्कुल परिसरातील असंख्य महिलांनी नगरसेविका स्नेहल खोरे यांच्या हळदी कुंकू समारंभास हजेरी लावत लकी ड्रॉ स्पर्धेत सहभाग नोंदविला.

फोटो ओळी- मोरया फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभात महिलांना मास्कचे वाण देताना जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे दिसत आहे. यावेळी लकी ड्रॉ स्पर्धेत परिसरातील महिला भगिनींनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here